शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शरद साखर कारखाना; ७९.२५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:30 IST

शरद सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी ७९.२५ टक्के शांततेत मतदान पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : शरद सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी रविवारी ७९.२५ टक्के शांततेत मतदान पार पडले. मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले. ५२९२ पैकी ४१९४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.२० जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात होते. २६ सप्टेंबर रोजी मतमोजणी होऊन त्याचदिवशी निकाल जाहीर होईल. शरद सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडीसाठी पैठण तालुक्यातील १७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. कारखान्याचे संस्थापक माजी आमदार चंद्रकांत घोडके यांच्या मार्गदर्शनाखालील सर्वपक्षीय पॅनल व विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलमधे सरळ लढत असल्याने आज दोन्ही पक्षाचे पुढारी मतदान करून घेण्यासाठी दिवसभर फिरत होते. नवगाव, आवडेउंचेगाव, टाकळीअंबड, हिरडपुरी, विहामांडवा, चौंढाळा, केकतजळगाव, कोळीबोडखा, हिंगणी, कुतुबखेडा, पाचोड, कडेठाण, आडूळ आदी मतदान केंद्रांवर मतदान झाले. आ. भुमरे, काँग्रेसचे रवींद्र काळे, अप्पासाहेब निर्मळ, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, विनोद बोंबले, नंदलाल काळे, साईनाथ सोलाट आदी तर दुसºया बाजूने माजी आमदार चंद्रकांत घोडके, माजी आमदार संजय वाघचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र शिसोदे, माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, अनिल घोडके, तुषार शिसोदे, अरूण काळे, अ‍ॅड. बद्रीनारायण भुमरे, गुलदाद पठाण आदी मान्यवर केंद्रांवर फिरुन मतदान करून घेत होते. टाकळी अंबडमध्येही उत्साह होता.