अशोक बेलखाडे यांना शामराव बोधनकर प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर
By | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:49+5:302020-11-28T04:06:49+5:30
पुरस्काराचे हे ७ वे वर्ष असून, पुरस्कार सोहळा ५ डिसेंबरला सायंकाळी ६ वा. वसंतराव नाईक महाविद्यालय येथे संपन्न होणार ...

अशोक बेलखाडे यांना शामराव बोधनकर प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर
पुरस्काराचे हे ७ वे वर्ष असून, पुरस्कार सोहळा ५ डिसेंबरला सायंकाळी ६ वा. वसंतराव नाईक महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य राजाराम राठोड हे राहणार असून, प्रमुख पाहुणे जेष्ठ लेखक डॉ. अरुण प्रभुणे हे राहतील. या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर कार्यवाहक डॉ. उर्मिला चाकूरकर, रा. रं. बोराडे, जयदेव डोळे, प्रा. श्रीराम जाधव, श्रीकांत उमरीकर, डॉ. शिरीष खेडगीकर, शोभा शिरढोणकर, दीपक कासराळीकर, अभय बोधनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राघवेंद्र चाकूरकर यांनी केले आहे.