शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत

By राम शिनगारे | Published: December 04, 2023 7:43 PM

श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला.

कविवर्य ना.धों. महानोर साहित्यनगरी, गंगापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) : अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत चालला आहे. सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपापले वाचळवीर निर्माण केले आहेत. परस्परांविषयी द्वेषपूर्ण वक्तव्ये करून टोकाचा विखार निर्माण करीत सामाजिक सलोखा नष्ट करीत आहेत. अशा राजकीय पक्षांच्या वाचाळवीरांच्या भाषेची लाज वाटते. त्याबद्दल ४३वे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपात ठराव घेऊन खंत व्यक्त करण्यात आली.

श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, मार्गदर्शक आ. सतीश चव्हाण, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव मनाळ, त्रिंबकराव पाथरीकर, किरण सगर, दादा गोरे, कुंडलिक अतकरे, प्राचार्य डॉ. सी.एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार, वैशाली बागुल, समन्वयक डॉ. गणेश मोहिते आदींची उपस्थिती हाेती. यावेळी १० ठराव मंजूर केले. त्यात शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज द्यावे, मराठवाड्यातील रेल्वेमार्ग दुहेरी करून मध्य विभागाशी जोडावा, गंगापूरमध्ये वातानुकूलीत सांस्कृतिक सभागृह बांधावे, मराठवाड्याच्या हक्काचे २२ टीएमसी पाणी विनाविलंब द्यावे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, शेतकऱ्यांना खर्चावर आधारित शेतीमालास भाव मिळावा, मराठी शाळा बंद करू नयेत आणि जायकवाडी धरणावर प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पामुळे मत्स्यमारी करणाऱ्या समूहासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र हलविण्यात यावा, हे ठराव संमेलनात मंजूर केले. ठरावांचे वाचन प्रा. किरण सगर यांनी केले. समारोपाच्या कार्यक्रमात कौतिकाराव ठाले पाटील यांच्यासह संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. समन्वयक डॉ. गणेश मोहिते यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन तर उपप्राचार्य डॉ. विशाल साबणे यांनी आभार मानले.

गंगापूरमध्ये मसापची शाखा स्थापन होणारगंगापूर शहरात साहित्य संमेलन घेण्यामागे याठिकाणी साहित्य चळवळ रुजावी हा हेतू होता. आम्ही फक्त आयोजनाचे काम केले. संमेलनातील सर्व निर्णय मसापने घेतले. आगामी काळात मसापची गंगापूर शहरात शाखा स्थापन करण्यात येईल, असे संमेलनाचे मार्गदर्शक आ. सतीश चव्हाण यांनी जाहीर केले. तसेच संमेलनात घेतलेल्या ठरावांचा पाठपुरावा राज्य शासनाकडे करण्यात येईल, असेही आ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनAurangabadऔरंगाबाद