उपनगराध्यक्षपदी शाहआलम
By Admin | Updated: July 17, 2014 01:07 IST2014-07-17T01:06:04+5:302014-07-17T01:07:52+5:30
जालना : नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शाह आलमखान यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उपनगराध्यक्षपदी शाहआलम
जालना : नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शाह आलमखान यांची बिनविरोध निवड झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी १० वाजता नगराध्यक्षपदी पार्वताबाई रत्नपारखे यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा यांनी केली. त्यानंतर रत्नपारखे यांची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १ वाजता उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ होती. या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नूरखान व शाह आलमखान यांनी अर्ज दाखल केले. मात्र राकाँकडून दोन अर्ज सादर झाल्याने नगरसेवकांमध्ये संभ्रम उडाला. राजेश राऊत व अन्य सदस्यांनी पक्षाचे नेते अंकुशराव टोपे यांच्याशी संपर्क साधला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेत नूरखान यांचे मन वळविण्याचा प्रयत्न झाला. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अखेर पक्षाने व्हिप काढल्यानंतर नूरखान यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे व समर्थक अपक्ष असे एकूण २९ सदस्य हजर होते. त्यामुळे एकमेव अर्ज राहिलेल्या शाह आलमखान यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
भोकरदनमध्ये
राजाभाऊ देशमुख
भोकरदन - नगर परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या रेखाताई चंद्रकांत पगारे यांच्या निवडीची औपचारिक घोषणा झाली. तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे़ उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे राजू खिरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता.मात्र खिरे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे देशमुख यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी अर्चना चिने, शफीकखॉ पठाण, अॅड. हर्षकुमार जाधव, कमल जेठे, नगसेवक सईद कादरी, राजू खिरे, गफ्फार कादरी, शब्बीर कुरेशी, शेख नजीर, रेखा दारूंटे, सीमा जाधव आदी होते.
अंबडमध्ये
संदीप आंधळे
अंबड - नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी मंगल काकासाहेब कटारे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली. तर उपाध्यक्षपदासाठी संदीप आंधळे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने आंधळे यांचीही बिनविरोध निवड झाली. यावळी संतोष सोमाणी, संतोष जेधे, कैलास भोरे, राजेश सावंत, संजय साळवे, शेख शाहेद, जितेंद्र बुर्ले, ललिता बुर्ले, मल्लेका शाहेद, सुमनबाई साळवे, वैशाली राऊत, वैशाली सावंत, विक्रम राजपूत, काँग्रेसचे गटनेते केदार कुलकर्णी, खुर्शीद जिलाणी, जाकेर डावरगांवकर आदी होते.