शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

२७0 गावांतील सातबारा अद्ययावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:49 IST

जिल्हाधिकाºयांनी संगणकीकृत सातबारांची बाब मनावर घेतल्याने हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २७0 गावांतील सातबारा अद्ययावत झाल्या आहेत. जिल्ह्याला २00 गावांचे उद्दिष्ट असताना २७0 गावांत काम झाले आहे.

हिंगोली : जिल्हाधिकाºयांनी संगणकीकृत सातबारांची बाब मनावर घेतल्याने हिंगोली जिल्ह्यातील तब्बल २७0 गावांतील सातबारा अद्ययावत झाल्या आहेत. जिल्ह्याला २00 गावांचे उद्दिष्ट असताना २७0 गावांत काम झाले आहे.हिंगोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३00 गावांतील सातबारा अद्ययावत करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सर्व तहसीलदारांना कडक सूचना दिल्या होत्या. या प्रणालीत वारंवार होणाºया बदलामुळे तसेच पूर्वीच्या सातबारातील काही कॉलमच नसल्याने दुरुस्तीत अडचणी येत होत्या. त्यामुळे शासनाच्या या प्रक्रियेत री-एडिटपर्यंतचा प्रवास केला आहे. यात सातबारातील दुरुस्ती, होल्डिंगमधील क्षेत्रफळ कमी-जास्त आढळत असल्यास त्याची दुरुस्तीही करण्यात आली. ३१ आॅगस्टपर्यंत महाराष्ट्रात आॅनलाईन सातबाराची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाले नाही. मात्र निदान आता हिंगोली जिल्ह्यातील २७0 गावांतील सातबारा या आॅनलाईन झाल्याचे प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.हिंगोली जिल्ह्यात एकूण ६९७ महसुली गावे आहेत. यात खातेदुरुस्तीची कामे ४६७ गावांत पूर्ण झाली आहेत. तर री-एडिटद्वारे दुरुस्तीची कामे पूर्ण केलेल्या गावांची संख्या २८३ आहे. यातूनही सातबारा अंतिम झालेल्या गावांची संख्या २७0 पर्यंत पोहोचली आहे. तर ४२७ गावांतील कामे मात्र अजूनही पूर्ण होणे बाकी आहे. पूर्ण झालेल्या कामाची टक्केवारी ३८.७४ टक्के एवढी आहे.