शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

छावणी उड्डाणपुलावर सात वाहनांचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:59 IST

सात वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : शहरातून वाळूजकडे निघालेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे छावणीच्या उड्डाणपुलावरून तो मागे गेल्याने मागून येणारी सात वाहने एकमेकांवर धडकल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातामुळे नगर नाका ते लिंक रोड या मार्गावर वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागल्या. वाहतूक शाखा व छावणी पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने हलविल्यानंतर दोन तासाने वाहतूक पूर्वपदावर आली.ट्रक (क्रमांक डब्ल्यू.बी. -१५, बी ७८६४) हा स्क्रॅप घेऊन नगरनाकामार्गे वाळूजच्या दिशेने चालला होता. छावणीच्या उड्डाणपुलावरून वेगाने जाताना पुढे असलेल्या कॅश व्हॅनला ( एम.एच. ४३, ए.डी.१८९८) ओव्हरटेक करीत हा ट्रक जाऊन व्हॅनवर धडकला. या अपघातातात ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे पुलाच्या चढावरून हा ट्रक घरंगळत खाली आला. पाठीमागून वेगाने येणाºया जीपवर ( एम.एम.२० ई.ई ५१९२) जाऊन ट्रक धडकला. यानंतर पाठीमागून येणाºया दोन कार (एम.एम.२०, डी. जे.३६०३ व (एम.एच.१२, जे.झेड.-१५५६) आणि एक खाजगी बस एकमेकांवर जाऊन धडकले. या विचित्र अपघातात पाचही वाहनांचे नुकसान झाले. जीपचालक रामेश्वर गोखले हा जीपमध्ये अडकला होता. अनिल पांढरे व इतरांनी जीपचालक रामेश्वर गोखले यास सुखरूपपणे बाहेर काढले. या अपघातात एकमेकांवर धडकल्यामुळे दोन कार, एक जीप व इतर वाहनांतील चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.छावणीचे फौजदार महादेव पुरी, वाहतूक शाखेचे केशव विधाते, मिर्झा बिसमिल्ला, शेख बाबर, पोकॉ.शेख, चव्हाण, साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने हलविल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वाहतूक कासव गतीने सुरू झाली.अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. रात्री उशिरापर्यंत या मार्गावरून कमी गतीने वाहनांची ये-जा सुरू झाल्यामुळे अडकलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.