शहरातील सात जणांनी सायकलने केला दोन हजार किमीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:09 IST2021-01-13T04:09:29+5:302021-01-13T04:09:29+5:30
२०५० किमीचा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांमध्ये रवींद्र बिनायके, विजय पाटोदी, निखिल कासलीवाल, रितेश बडजाते, पीयूष सेठी, तन्मय गोधा ...

शहरातील सात जणांनी सायकलने केला दोन हजार किमीचा प्रवास
२०५० किमीचा सायकल प्रवास यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्यांमध्ये रवींद्र बिनायके, विजय पाटोदी, निखिल कासलीवाल, रितेश बडजाते, पीयूष सेठी, तन्मय गोधा यांनी सांगली व कोल्हापूर येथील ६५ सायकल यात्रीकरूंसोबत प्रवास केला. यात श्रवनबेळगाव ते कन्या कुमारीपर्यंत सायकलीवर प्रवास करून धार्मिक ठिकाणी भेट दिल्या. प्रवासादरम्यान अहिंसा, शाकाहार या विषयाचा प्रचार-प्रसार त्यांनी केला. हा यशस्वी प्रवास त्यांनी १७ ते ३१ जानेवारीदरम्यान पूर्ण केला. या सायकलवीरांचे स्वागत सोहळा रविवारी शहागंज येथील चंद्रसागर धर्मशाळा येथे करण्यात आला. पंचायतचे अध्यक्ष ललित पाटणी यांनी सत्कार केला. यावेळी अशोक अजमेरा, पुलक जनचेतना मंचचे सुनील काला, प्रसाद पाटणी, सुनील पांडे, प्रकाश अजमेरा, शांतिलाल पाटणी, महावीर पाटणी, पारस गोधा, प्रवीण लोहाडे, नीता गोधा आदींची उपस्थिती होती.
चौकट
२०५० किमी सायकल प्रवास करणाऱ्या जैन सायकलिस्ट ग्रुपच्या सात सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबत पदाधिकारी.