पेठ गावात सात घरफोड्या
By Admin | Updated: January 19, 2015 00:57 IST2015-01-19T00:47:53+5:302015-01-19T00:57:09+5:30
लातूर : लातूर तालुक्यातील पेठ येथे एकाच दिवशी गावातील सात ठिकाणी झालेल्या घरफोडीत सोन्याचे दागिने,

पेठ गावात सात घरफोड्या
लातूर : लातूर तालुक्यातील पेठ येथे एकाच दिवशी गावातील सात ठिकाणी झालेल्या घरफोडीत सोन्याचे दागिने, कपडे नगदी १२ हजार असा एकूण २ लाख ९२ हजार रूपयांचा मुद्देमाल घेवून चोरट्याने पोबारा केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली़
लातूर शहरापासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पेठ या गावात रविवारी पहाटे सात ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत़ यामध्ये शेतकरी बालाजी चपडे यांच्या घरातील पाच तोळे सोन्याचे गंठण, दोन तोळ्याची चेन, कपडे, नगदी बारा हजार रूपये, शेषेराव पांडूरंग सुर्यवंशी यांच्या घरातील पितळी भांडे, साड्या, दुकानदार सुधाकर दुधाळे यांच्या दुकानातील रोख चार हजार रूपये व सिगारेटची पाकिटे अशा तिघा जणांच्या घरातील २ लाख ९२ हजार रूपयांचा मुद्देमाल घेवून चोरट्यांनी पोबारा केला तसेच मुरलीधर महादेव जोगदंड, शेतकरी स्वप्नील मुळे, सेवानिवृत्त शिक्षक प्रल्हाद भोसले, पंढरीनाथ ढोरमाने या चार जणांच्याही घरी कडी, कोंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली़ परंतु एकाच दिवशी सात ठिकाणी घरफोड्या झाल्याने गावात भितीचे वातावरण झालेले आहे़
या प्रकरणी शेतकरी बालाजी चपडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कलम ४६७, ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत़ (प्रतिनिधी)
पेठ गावात एकाच दिवशी सात ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपाधीक्षक अर्चना पाटील, स्थागु.शाखेचे पोनि. बी़जी़मिसाळ, ग्रामीणचे पोनि. गजानन भातलवंडे यांनी श्वान पथकासह पाहणी केली. मात्र माग मिळाला नाही़ मात्र वापस येताना याच भागात चोरी करण्याच्या उद्देशाने आॅॅटोमधून फिरत असलेले सुमीत दगडू गर्जेवाड व तात्याराव विठ्ठल मारे (रा ़मळवटी रोड) हे दोन जुन्या घरफोड्यातील आरोपी पोलीसांना बघताच उसाच्या फडात पळाले. त्यांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़