शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरातींबाबत व्यापक धोरण ठरवा

By admin | Updated: December 13, 2014 00:28 IST

औरंगाबाद : टी. व्ही. चॅनल्सवरून दाखविण्यात येणाऱ्या औषधांच्या जाहिरातींमुळे स्व-औषध घेण्यास, तसेच स्व-उपचाराला प्रोत्साहन मिळू शकते.

औरंगाबाद : टी. व्ही. चॅनल्सवरून दाखविण्यात येणाऱ्या औषधांच्या जाहिरातींमुळे स्व-औषध घेण्यास, तसेच स्व-उपचाराला प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे सर्वच ड्रग्ज आणि औषधांची जाहिरात करण्यास परवानगी देता येईल अथवा नाही, हे सुनिश्चित करण्यासंदर्भात सहा महिन्यांत व्यापक नीती विकसित करा, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांना दिले आहेत. अ‍ॅड. महेश रामनाथ सोनवणे आणि अ‍ॅड. सचिन चंद्रकांत सारडा यांनी २००२ मध्ये ही जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच अंतिम सुनावणी होऊन न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए. एम. बदर यांनी हा निर्णय दिला. टी. व्ही. वर प्रदर्शित होणाऱ्या कामोत्तेजनावर्धक औषधी, खोकल्याच्या औषधांच्या जाहिराती दाखविण्यात येतात. या जाहिरातींमुळे सर्दी, ताप, अपचन, अंगदुखीसाठी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी रुग्ण थेट दुकानातून औषधी खरेदी करतो आणि परस्पर सेवनही करतो. विशेषत: खोकल्याच्या औषधांची बाजारात सर्रास विक्री होत असल्याने काही जण त्याचा नशेकरिता वापर करीत आहेत. त्यामुळे अशा औषधांच्या दुष्परिणामाबाबत तसेच मर्यादेबाबत जनतेमध्ये अज्ञानीपणा असल्याने या जाहिरातीवर प्रतिबंध करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. याचिके वर निर्णय देताना टी. व्ही. चॅनल्सवरून दाखविण्यात येणाऱ्या औषधांच्या जाहिरातींना सरसकट परवानगी देता येईल अथवा नाही, हे संबंधित अधिकाऱ्यांनी सुनिश्चित करावे. जर जाहिरातींना परवानगी देता येत असेल तर त्यातून स्व-औषध प्रयोग, स्व-उपचाराला प्रोत्साहन देत असल्याच्या वस्तुस्थितीची जाणीव ठेवावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने निकष ठरवावेत. सिनेसृष्टीतील सेन्सॉर बोर्डाच्या धर्तीवर सक्षम नियंत्रक प्राधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची शिफारस न्यायालयाने केली. प्राप्त तक्रारीवर दोन महिन्यांत निर्णय घेण्यास संबंधित अधिकारी बाध्य राहतील, असे निकालात नमूद केले आहे. न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोर पालन करावे. त्याचा भंग झाल्यास तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल, असेही न्यायालयाने आदेशित केले आहे. या याचिकेत अ‍ॅड. महेश सोनवणे यांनी स्वत: बाजू मांडली.