सेप्टिक टँक ग्रामीण भागासाठी हानीकारक
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:24:25+5:302014-06-26T00:38:13+5:30
परभणी : सेफ्टी टँकचे शौचालयापासून पाणी व हवेचे प्रदुषण होत असल्याने ते पर्यावरणासही योग्य नाही.

सेप्टिक टँक ग्रामीण भागासाठी हानीकारक
परभणी : सेफ्टी टँकचे शौचालयापासून पाणी व हवेचे प्रदुषण होत असल्याने ते पर्यावरणासही योग्य नाही. मात्र सेप्टीक टँक पेक्षा सोपा शौचालय ग्रामीण भागासाठी फायदेशीर असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंमरे यांनी केले.
येथील जिल्हा परिषद सभागृहात निर्मल भारत अभियान व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे म्हणाले, ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी आधुनिकतेच्या नावाखाली सेफ्टी टँकचे शौचालय बांधले जात आहे. मात्र या शौचालयास अधिक खर्च, जास्त जागा, जास्त पाणी लागत असून हे पूर्णत: दुर्गंधीमुक्त नाही. शिवाय अशा शौचालयातून सोडलेल्या पाण्यापासून दुर्गंधी पसरून गावात डासांची उत्पत्ती होऊन साथीचे रोग पसरू शकतात. तसेच सेप्टिक टँकमधील पाणी शोश खड्यात सोडणे आवश्यक आहे. परंतु असे होत नाही. मात्र या शौचालयाच्या तुलनेत सोडा शौचालय अधिक फायदेशीर आहे. या शौचालयासाठी खर्च व जागा कमी लागते.
वापरादरम्यान पाणीही कमी लागत असून ते पूर्णत: दुर्गंधी मुक्त आहे. त्यामुळे हे शौचालय कुटुंबाच्या आरोग्यासाठी रक्षणदायी असून यातून उत्तम सोनखतही मिळते, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
शौचालयासाठी दहा हजारांचे अनुदान
ग्रामीण भागामध्ये सोपा शौचालय बांधण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ५४०० रुपये तर शौचालय बांधून वापर सुरू केल्यानंतर लाभार्थ्यास निर्मल भारत अभियानांतर्गत ४६०० रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. असे एकूण शौचलयासाठी १० हजार रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे.
ज्यांना रोहयो अंतर्गत अनुदानाचा लाभ घ्यायचा नाही त्यांना केवळ प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेता येईल. गाव पातळीवरील शौचालय बांधकामास गती देण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा व संबंधित कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देऊन स्वच्छता अभियानास गती देणे गरजेचे आहे.