शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कोरोनासाठी घराघरात वेगळे बजेट; अनेक वस्तूंची झाली सामानात एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 17:19 IST

प्रत्येकाच्या वागण्यात आणि दैनंदिन कामाच्या स्वरूपात कोरोनामुळे अनेक बदल झाले आहेत.

ठळक मुद्देस्वयंपाक घरातही विविध बदल, जीवनशैलीत उल्लेखनीय बदलमास्क, सॅनिटायझर, काढा आयुर्वेदिक औषधांची झाली खरेदी

औरंगाबाद : कोरोनामुळे अनेक वस्तूंनी आपल्या आयुष्यात प्रवेश केला आहे. सध्याची परिस्थिती पाहता मास्क, सॅनिटायझर आणि तत्सम काही वस्तूंशिवाय जगणे कठीण झाले आहे. कोरोनापासून संरक्षण म्हणून अनेक घरांमध्ये विशेष साहित्यांची खरेदी झाली आहे. त्यामुळे आता महिन्याला एक ठराविक रक्कम कोरोनाविशेष सामानासाठी आवर्जून बाजूला काढून ठेवावी लागत असल्याचे काही गृहिणींनी सांगितले. 

प्रत्येकाच्या वागण्यात आणि दैनंदिन कामाच्या स्वरूपात कोरोनामुळे अनेक बदल झाले आहेत. घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या खिशात, पर्समध्ये, गाडीत आता सॅनिटायझरच्या लहान-लहान बाटल्या मिरवू लागल्या आहेत. घरांमध्ये चपला ठेवण्याची जागाही बदलण्यात आली असून दारामध्येच चपला ठेवण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक घरांच्या बाहेर सॅनिटायझर घातलेल्या  पाण्याची बादली दररोज भरलेली असते. या पाण्याने पाय धुऊन मगच घरात यायचे, असे नियमच काही गृहिणींनी केले आहेत. बाहेरून आल्यावर न चुकता आंघोळ आणि घातलेले कपडे थेट धुवायला टाकणे, रात्री झोपताना वाफ घेणे हा तर अनेकांचा नित्यक्रम झाला आहे. अंगणात तर सॅनिटायझर असतेच; पण घराच्या हॉलमध्येही आता इतर शोभेच्या वस्तूंबरोबर सॅनिटायझर स्प्रेनेही मानाचे स्थान पटकाविले आहे. घरात प्रत्येक सदस्यासाठी किमान दोन मास्कची खरेदी झालेली आहे. यामुळे आता महिन्याला साबण, हॅण्डवॉश,  वॉशिंग  पावडर, फिनेल यांचाही खर्च वाढल्याचे महिलांनी सांगितले.

स्वयंपाक घरातही विविध बदल :- हळद, लिंबू, अद्रक, तुळस आणि इतर साहित्यांनी तयार झालेला काढा घेऊनच  सध्या अनेकांचा दिवस  सुरू होत आहे. आधी हा काढा आणि नंतर चहा असा बदल करून घेतला आहे. - सर्दी-खोकल्यापासून संरक्षण करणारे लवंग, ज्येष्ठ मध, सुंठ यासारखे पदार्थ आज अनेकांच्या स्वयंपाकघरात अग्रभागी आले आहेत.- एरवी थोडासा लागणारा सोडा आता भाज्या धुण्यासाठी वापरण्यात येत असल्याने दर महिन्याला किराणा यादीत न चुकता सोडा आणि जास्तीचे मीठ या पदार्थांचा समावेश करण्यात येत आहे.- बाहेरून घरात आलेल्या व्यक्तीला गरम पाणी देणे आता अनेक गृहिणींच्या अंगवळणी पडले आहे. - दररोज भाजी घेण्यापेक्षा आता आठवड्याच्या भाज्यांची खरेदी एकदाच होत असल्याने भाज्या धुण्यासाठी  मोठा टब, बाहेरून आणलेल्या वस्तू काही काळ तशाच ठेवण्यासाठी जाळीचे ट्रे, सॅनिटायझर फवारणीसाठी स्प्रे यांची खरेदी होत आहे.

घरगुती वापरासाठीही सॅनिटायझरची कॅनमार्च महिन्यात कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा १०० मिलि, २०० मिलि सॅनिटायझरच्या बाटल्यांना मोठी  मागणी होती; परंतु आता थेट ५ लिटर ते १०० लिटरच्या कॅन घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. घरगुती वापरासाठीही लोक ५ ते १० लिटरच्या कॅन नेत आहेत. त्यामुळे लहान बाटल्यांची विक्री घटली असून, जास्त  प्रमाणातील सॅनिटायझरला मोठी मागणी आहे.- विनोद लोहाडे, सचिव, औरंगाबाद केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHomeसुंदर गृहनियोजनAurangabadऔरंगाबाद