शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विमान आणि उद्योग क्षेत्रात खळबळ

By admin | Updated: August 1, 2016 00:07 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक आलोक वार्ष्णेय लाचप्रकरणी ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्याने विमान आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक आलोक वार्ष्णेय लाचप्रकरणी ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्याने विमान आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील त्यांच्या अवघ्या वर्षभराच्या कार्यकाळात कारवाई झाल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला नाही. शिवाय विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.डी.जी. साळवे यांची बदली झाल्यानंतर जुलै २०१५ मध्ये चिकलठाणा विमानतळाच्या संचालकपदावर आलोक वार्ष्णेय यांची बदली करण्यात आली. वार्ष्णेय यापूर्वी दिल्ली येथील विमानतळाच्या संचालकपदी कार्यरत होते. विमानतळावरून कार्गो सेवा, औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा, वायफाय सुविधा, रेस्टॉरंट सेवा आणि नव्या विमानसेवेसाठी प्रयत्न यामुळे ते कायम चर्चेत राहिले. मात्र त्याच वेळी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. विमानतळावर टॅक्सी सेवा सुरू करण्यावरून टॅक्सी संघटना आणि प्राधिकरणात धुसफूस सुरू होती. आधीच एका कंपनीतर्फे सेवा सुरू असताना पुन्हा दुसऱ्यास सेवेस मंजुरी देणे अडचणीचे असल्याचे वार्ष्णेय यांचे म्हणणे होते, तर ही सेवा सुरू करण्यास मंजुरी द्या, त्यासाठी आवश्यक वाटल्यास निविदा प्रक्रिया करावी, असे संघटनेचे म्हणणे होते. यावरून गेल्या काही दिवसांपासून संघटना आणि त्यांच्यात चांगलीच जुंपली होती. गिफ्ट म्हणून गाडी?वार्ष्णेय ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्यानंतर काही जण त्यांच्या कार्यपद्धतीवर चांगलीच टीका करीत आहेत. अनेक कामांसाठी ते जाणीवपूर्वक अडवणूक करीत होते. ४देवाणघेवाण केल्यानंतरच त्यावर तोडगा निघत होता. त्यांना एका कंत्राटदाराने गिफ्ट म्हणून चारचाकी गाडीची आॅफर दिल्याची चर्चा यानिमित्ताने समोर आली आहे.पदभार शरद येवले यांच्याकडेआलोक वार्ष्णेय यांच्यावरील कारवाईमुळे आता उपमहाप्रबंधक शरद येवले यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त पदभार येणार आहे, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.