शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कारागृहाच्या २५ पोलिसांवर निलंबनाच्या कारवाईने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 8:01 PM

गंभीर स्वरूपाची चूक करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांत निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली, तर पाच अधिकारी आणि २० कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देआणखी २० पोलिसांची खातेनिहाय चौकशी

औरंगाबाद : हर्सूल मध्यवर्ती कारागृहासह १४ कारागृहांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांत आपसातील हेव्यादाव्यांमुळे बेशिस्त वाढल्याचे निरीक्षण कारागृह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. बेशिस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी गेल्या काही दिवसांत २५ पोलिसांना निलंबित केले आहे. २० कर्मचारी आणि ५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

कारागृह उपमहानिरीक्षक मध्य विभागांतर्गत हर्सूल मध्यवर्ती आणि नाशिक मध्यवर्ती कारागृह, जालना, जळगाव, धुळे, उस्मानाबाद, नंदुरबार, लातूर, परभणी, नांदेड, बीड येथे जिल्हा कारागृह, पैठण येथे जिल्हा खुले कारागृह तर भुसावळ येथील दुय्यम जेलवर नियंत्रण ठेवण्यात येते. या सर्व कारागृहात कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी हे वर्षानुवर्षे एकाच जेलमध्ये अथवा दोन किंवा तीन जेलमध्येच कार्यरत आहेत. अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची दर दोन वर्षांनंतर तर अन्य जेलर आणि कर्मचाऱ्यांची  पाच ते सहा वर्षांत बदली होणे आवश्यक असते. मात्र, ६० ते ७० टक्के अधिकारी, कर्मचारी  अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी अथवा दोन-तीन वर्षे दुसऱ्या जेलमध्ये राहून पुन्हा आवडत्या  जेलमध्ये बदली करून घेतात. असे अधिकारी आणि कर्मचारी जेलमध्ये एकाधिकारशाही गाजवतात. यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आपसांत मतभेद असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत समोर आले. यातून बेशिस्तीच्या घटना घडतात. जेलच्या  मध्य विभागांतर्गत असलेल्या १४ जेलमध्ये बेशिस्त ५० हून अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध जेल मध्य विभाग  उपमहानिरीक्षक दिलीप झगडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गंभीर स्वरूपाची चूक करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांत निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली, तर पाच अधिकारी आणि २० कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली.

चौकशी अधिकाऱ्यांना नोटिसा अधिकारी, कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी विहित कालावधीत पूर्ण करून त्यांना शिक्षा सुनावली, तर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर वचक बसतो. मात्र, अनेकांची चौकशी वर्षानुवर्षे प्रलंबित राहते.  यामुळे चौकशी तातडीने पूर्ण करून अहवाल द्यावा अथवा वेळेत चौकशी न करणाऱ्या अधिकाऱ्यांना उपमहानिरीक्षक कार्यालयांकडून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसsuspensionनिलंबन