आर्थिक विवंचनेतून वृद्धाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 21:32 IST2019-05-06T21:32:00+5:302019-05-06T21:32:09+5:30
आर्थिक विवंचनेतून वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी छावणी परिसरात उघडकीस आली.

आर्थिक विवंचनेतून वृद्धाची आत्महत्या
औरंगाबाद : आर्थिक विवंचनेतून वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी छावणी परिसरात उघडकीस आली.
अशोक वामन खोतकर (६५, रा. पानचक्की परिसर), असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, खोतकर पूर्वी पेंटर म्हणून काम करीत होते. वृद्धापकाळामुळे त्यांचे काम बंद झाले होते. आर्थिक स्थिती हलाखीची झाल्याने ते खचले होते.
सोमवारी पहाटे ते घराबाहेर पडले. त्यानंतर आंबेडकर लॉ कॉलेजजवळच्या झाडाला वायरच्या साह्याने त्यांनी गळफास घेतला. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर छावणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खोतकर यांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोहेकॉ शेख हसिना तपास करीत आहेत.