शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक सोडून दुसरीकडेच गॅस विक्री; छ. संभाजीनगरमध्ये तीन एजन्सी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:29 IST

राजकीय राड्यानंतर पोलिसांची धाव अन् रात्री गॅस एजन्सीच्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : एजन्सी सोडून नियमबाह्य अन्य ठिकाणी अवैधरीत्या गॅस सिलिंडर विक्री प्रकरणात शुक्रवारी रात्री अखेर आदित्य भारत गॅस एजन्सीच्या धीरज फुलचंद बारवाल (४४, बल्सीलालनगर, म्हाडा कॉलनी), आनंद छगन अंबिलढगे (३५), उत्तम देवराव कसारे (३७, रा. सावंगी) या तीन कर्मचाऱ्यांवर हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल केला.

शुक्रवारी ऑडिटर सोसायटीतील आदित्य भारत गॅस एजन्सीपासून काही अंतरावर अवैधरीत्या गॅस सिलिंडर विक्री प्रकरणावरून राजकीय कार्यकर्त्यांनी राडा केला. घटनेची माहिती कळताच हर्सूल ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार, उपनिरीक्षक गणेश केदार, सचिन पागोटे यांनी धाव घेतली. अन्न वितरण अधिकारी भारती वाकोडे, पुरवठा निरीक्षक संदीप मोरे हेही घटनास्थळी दाखल झाले. राजकीय कार्यकर्त्यांनी सदर एजन्सी कर्मचारी वाहनातून भारत कंपनीचे एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर विक्री करत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी एजन्सीसमोर ग्राहकांची गर्दी असल्याने त्यांनी दूर येऊन सिलिंडर विक्री करत असल्याचा दावा केला.

ना नोंद, बुकिंग डिटेल्सपोलिसांनी त्यांना ग्राहकांची नोंदणी क्रमांक, यादीबाबत विचारणा केली. मात्र, कर्मचारी कुठलीच माहिती सादर करू शकले नाहीत. त्यांच्या ताब्यात ४८ गॅस सिलिंडर आढळले. त्यापैकी ५ भरलेले, तर ४३ सिलिंडर रिकामे आढळले. वितरण अधिकारी वाकोडे यांच्या तक्रारीवरून बारवाल, अंबिलढगे व कसारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कायदा हातात घेऊ नका, निरीक्षकांनी खडसावलेउद्धवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर आगपाखड करत धावून जाण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचे ते वागणे पाहून पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी त्यांना खडसावले. 'पोलिस उपस्थित आहेत, तुम्ही कायदा हातात घेण्याची गरज नाही', असे सुनावल्यानंतर पदाधिकारी शांत झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Sold Illegally; Three Agency Employees Booked in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : Three gas agency employees were booked for illegally selling gas cylinders outside their agency in Chhatrapati Sambhajinagar. Authorities seized 48 cylinders, including five filled ones, after a complaint. Police intervened to prevent activists from taking the law into their hands during the incident.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर