शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

कारखान्याची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह द्या; साखर आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 18:43 IST

सुमारे २०० शेतकऱ्यांचे अहमदनगर जिल्ह्यातील यूटेक शुगरकडे अडकले २ कोटी

ठळक मुद्देसाखर आयुक्तांनी अहमदनगर येथील कारखान्याला बजावली नोटीससाखर आणि इतर उत्पादनाची विक्री करून या रक्कम वसूल करावीअहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना आयुक्तांचे आदेश

कायगाव (औरंगाबाद ) : कायगाव भागातील सुमारे दोनशे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे हप्ते थकविल्याने अहमदनगर जिल्ह्यातील यूटेक शुगरला मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत आदेश काढल्याने कायगाव परिसरातील शेतकऱ्यांचे ७ महिन्यांपासून अडकलेले सुमारे २ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गेल्या ऊस हंगामात गंगापूर तालुक्यातील कायगाव, भिवधानोरा, अगरवाडगाव, धनगरपट्टी, पखोरा आदीसह परिसरातील सुमारे २०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील युटेक शुगर लि. संगमनेर या साखर कारखान्याला सुमारे १० हजार मेट्रीक टन ऊस दिला होता. या काळात इतर जवळपास सर्वच साखर कारखान्यांनी तोडलेल्या उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना वाटप केले. मात्र, यूटेक शुगरकडून जानेवारी महिन्यापासून उसाचे पेमेंट देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. वास्तविक, शेतकऱ्यांच्या शेतातून ऊस तोडून नेल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना त्याचे पैसे देणे आवश्यक असतांना ७ महिने उलटूनही कारखान्याकडून पेमेंटचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेकडो शेतकरी अडचणीत सापडले होते.याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा कारखाना प्रशासन आणि साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र, शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नव्हता.

बुधवारी प्रहार शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब शेळके, रामकीसन औटे, संभाजी चव्हाण, कडूबाळ चव्हाण, गणेश पाठे, संतोष लहाने, सुरेश खैरे आदींसह शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ थेट पुण्यातील साखर आयुक्तालयात धडकले. यूटेक शुगरकडे अडकलेले पैसे मिळावे यासाठी साखर कारखान्याचा आगामी गळीत हंगाम परवाना रद्द करून, कारखान्याची मालमत्ता जप्त करावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वाटप करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी तात्काळ याबाबतचे आदेश निर्गमित केले.

अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेशकारखान्याला महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटीस बजावण्यात आली. याअंतर्गत युटेक कारखान्याची जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेल्या साखर आणि इतर उत्पादनाची विक्री करून या रक्कम वसूल करण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सन २०१९-२० या हंगामातील उसाचे थकीत एफआरपी नुसार प्रति मेट्रीक टन २१६६.४६ प्रमाणे १५ टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMONEYपैसाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र