शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उच्चपदस्थ अधिकारी घेणार टॉयलेटसोबत ‘सेल्फी’ !

By admin | Updated: July 31, 2016 01:14 IST

संजय तिपाले , बीड जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व जि.प. सीईओ नामदेव ननावरे या तीन प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर सात जण लवकरच

संजय तिपाले , बीडजिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व जि.प. सीईओ नामदेव ननावरे या तीन प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर सात जण लवकरच टॉयलेटसोबत सेल्फी घेणार आहेत. गेवराई येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १० उपेक्षित व गरजू मुलींच्या घरी बांधण्यात येणाऱ्या शौचालयांचा खर्च या अधिकाऱ्यांनी उचलला आहे. यातून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडू लागले आहे.सीईओ ननावरे यांच्या संकल्पनेतून ‘नातं जबाबदारीचं’ ही मोहीम राबविली जात आहे. वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले गरजू नातेवाईक, मित्रांना शौचालय बांधून द्यायचे आहे. शौचालय बांधल्यावर सेल्फी काढून तो जि.प. ला पाठवायचा आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात २५ हजार कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेण्याचे उद्दिष्ट ननावरे यांनी ठेवले आहे. शौचालयासाठी शासन अनुदान देते; परंतु आधी स्वत: लाभार्थ्याला पैसे खर्च करावे लागतात. जगण्याशीच संघर्ष असणाऱ्यांची शौचालय बांधण्याची ऐपत नसते. त्यामुळे यातून अनेकांना लाभ होणार आहे.दरम्यान, ननावरे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे ही संकल्पना मांडली, ‘जबाबदारीच्या नात्या’ची शिकवण देणारी ही मोहीम जिल्हाधिकारी राम, अधीक्षक पारसकर यांनीही उचलून धरली. गेवराई येथील कस्तुरबा गांधी विद्यालयातील दहा गरजू मुलींच्या घरी ही शौचालये बांधण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी तलवाडा, पोलीस अधीक्षक खेर्डावाडी व जि.प. सीईओ नंदपूर कांबी येथील विद्यार्थिनीला शौचालय बांधून देतील. ५ सप्टेंबर २०१६ पर्यंतची ‘डेडलाईन’ निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी राम, पोलीस अधीक्षक पारसकर यांनी मोहिमेसाठी वैयक्तिक योगदान दिल्याने प्रोत्साहन मिळाल्याचे ननावरे यांनी सांगितले. शौचासाठी उघड्यावर गेल्याने अपघात, सर्पदंश झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या आहेत. शिवाय घाणही पसरते, त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून याकडे सर्वांनी पहावे, असे आवाहन त्यांनी केले.