शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

पोलीस ठाण्यातील जप्त वाहनांचे टायर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 4:35 PM

पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

ठळक मुद्देएमआयडीसी सिडको ठाण्यातील प्रकार  सुटे भाग आणि टायर हे क्रेनचालकांकडे असल्याचा अजब दावा

औरंगाबाद : घात-अपघातात पोलिसांनी जप्त केलेले वाहन जसेच्या तसे परत मिळेल याची आता खात्री देता येत नाही. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त करून ठेवलेल्या वाहनांचे सुटे भाग आणि चक्क टायर्स गायब झाल्याचे समोर आले आहे. हे सुटे भाग आणि टायर चोरट्यांनी पळविले अथवा अन्य कोणी याबाबत मात्र गौडंबगाल आहे. ठाणेप्रमुखांनी मात्र वाहनांचे सुटे भाग आणि टायर हे क्रेनचालकांकडे असल्याचा अजब दावा केला आहे.

रस्ता अपघातासह अन्य विविध गुन्ह्यांत वापरलेले वाहन पोलीस जप्त करतात आणि ठाण्याच्या आवारात उभी करतात. ठाण्यातील मुद्देमाल नोंदवहीमध्ये या वाहनाची नोंद केली जाते. न्यायालयाच्या आदेशाने ते वाहन संबंधित वाहनमालकाला परत केले जाते. मात्र, बऱ्याचदा वाहन परत मिळण्याचा न्यायालयाकडून आदेश प्राप्त होईपर्यंत ते वाहन पोलीस ठाण्याच्या आवारातच उभे असते. अशा प्रकारे शेकडो वाहने एमआयडीसी सिडको ठाण्याच्या आवारात उभी आहेत. 

जप्त वाहनांचा सांभाळ करण्याची जबाबदारी ठाणेप्रमुखांची असते. असे असताना या ठाण्यातील अनेक वाहनांचे टायर्स गायब असल्याचे निदर्शनास आले. काळी-पिवळी जीप क्रमांक एमएच-२० डीएफ-००३० चे समोरील दोन्ही टायर काढून ही जीप दगडावर उभी करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी मॉर्निंग वॉक करणाऱ्या पाच जणांना चिरडून त्यांचे प्राण घेणाऱ्या स्कार्पिओ जीपचे मागील दोन्ही टायर गायब आहेत. याशिवाय अन्य एका ट्रकची केवळ बॉडी तेथे उभी आहे. या बॉडीखालील चारही टायर काढलेले आहेत. शिवाय या वाहनांचे हे तर डोळ्याने दिसणारे भाग आहेत. पोलिसांनी जप्त केलेली वाहनेच पोलीस ठाण्याच्या आवारात सुरक्षित न राहण्यामागचे काहीतरी गौडबंगाल आहे. या वाहनांच्या सुरक्षेकडे ठाणेप्रमुखांचे लक्ष्य नसल्याचे यावरून दिसून येते. 

पोलीस निरीक्षकाचा अजब दावायाविषयी एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना विचारले असता ते म्हणाले की, अपघातातील वाहन रस्त्यावरून ठाण्यात आणताना बऱ्याचदा टायर निखळून पडलेले असते, तर रस्त्यावरील वाहन उचलून आणण्याचे शुल्क क्रेनचालकास कोणी द्यावे, हा प्रश्न असतो. तेव्हा क्रेनचालक शुल्काच्या बदल्यात त्या वाहनांचे टायर काढून घेतो. जेव्हा तो वाहनमालक वाहन नेण्यासाठी न्यायालयाचे आदेश घेऊन येतो, तेव्हा त्याच्याकडून क्रेनचालक शुल्क घेऊन त्याच्या वाहनाचे टायर त्यास परत करतो, ही जुनी प्रथा आहे, असा अजब दावा त्यांनी केला.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी