शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेल्या वाळूची वाहतूक करणारे टिप्पर, जेसीबी जप्त

By admin | Updated: October 28, 2014 00:57 IST

आष्टी : परतूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी चार महिन्यापूर्वी साठविलेल्या वाळूचे पंचनामे करुन जप्त केलेल्या वाळूची चोरुन वाहतूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द आष्टी पोलिस ठाण्यात

आष्टी : परतूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी चार महिन्यापूर्वी साठविलेल्या वाळूचे पंचनामे करुन जप्त केलेल्या वाळूची चोरुन वाहतूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द आष्टी पोलिस ठाण्यात महसूल विभागाच्या वतीने तलाठ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. एक टिप्पर, जेसीबी ताब्यात घेण्यात आला आहे.जमादार एकनाथ पडूळ यांनी दिलेल्या माहितीनुसार गंगासावंगी ता. परतूर येथे गेल्या चार महिन्यापूर्वी एका गुत्तेदाराने अवैधरित्या साठविलेल्या गट क्र. १९० मध्ये मधील शेतातील ३२५ ब्रास वाळूचा पंचनामा करुन उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने वाळू जप्त केली होती; मात्र या वाळूची चोरुन विक्री झाली आहे. २७ आॅक्टोबर रोजी गोळेगाव सजाचे तलाठी जकीरोद्दीन म. अजिमोद्दीन यांना वाळू चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावर त्यांनी या वाळुचा पंचनामा केला. यात ५ ब्रास वाळू ज्याची किंमत २५००० रुपये व टिप्पर व जेसीबी असा एकूण ४० लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आष्टी पोलिस ठाण्यात टिप्पर (क्र.एमएच-२३-डब्ल्यू-२१८७), जेसीबी (क्र.एमएच-२३-टी-३०६) व टिप्पर चालक सहदेव महादेव कसबे रा. मंदा ता. वडवणी, जेसीबी चालक गजानन सखाराम वसावे तसेच मालक शिवाजी चाटे यांच्याविरुध्द कलम ३७९, ३४, ३ व ४ गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि हनुमंत उरलागुंडेवार हे करीत आहेत. (वार्ताहर)