‘त्या’ जीप चालकाचा शोध सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 20:37 IST2019-03-27T20:37:11+5:302019-03-27T20:37:24+5:30
वाळूज उद्योनगरीत मंगळवारी दोन कामगारांना चिरडणाऱ्या फरार जीप चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.

‘त्या’ जीप चालकाचा शोध सुरु
वाळूज महानगर : वाळूज उद्योनगरीत मंगळवारी दोन कामगारांना चिरडणाऱ्या फरार जीप चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. बुधवारी शवविच्छेदन झाल्यानंतर या दोन्ही मृत कामगाराचे मृतदेह नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मूळगावी घेऊन गेले.
हरिश्चंद्र रामलेखत यादव (४५ रा. ईश्वरपूर जि.आजमगढ, उत्तरप्रदेश) व रमेश पांडुरंग भालेकर (५० रा.देशगव्हाण ता.अंबड, जि.जालना) हे या दोघांचा जीपने (एम.एच.१४, डी.एच.९००८) धडक दिल्याने अपघातात मृत्यू झाला होता. अपघातानंतर जीपचालक जीप सोडून फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हरिश्चंद्र यादव व रमेश भालेकर यांच्या नातेवाईकांनी बुधवारी सकाळपासून घाटी रुग्णालयात गर्दी केली होती. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शवविच्छेदन प्रकिया पूर्ण झाल्यानंतर या दोघाचे मृतदेह त्यांच्या नातेवाईक़ांच्या स्वाधीन करण्यात आले. या दोघा मयत कामगाराचे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी मुळगावी घेऊन गेल्याचे उपनिरीक्षक उंबरे यांनी सांगितले.