कंपनीत भंगार चोरी करणारे आणि खरेदीदार अटकेत
By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:54+5:302020-12-04T04:12:54+5:30
रवी गणेश गायकवाड (३६), गणेश सांडू साळवे (४८), योगेश रावसाहेब गायकवाड (२०, सर्व राहणार ब्रीजवाडी) आणि चोरीचा माल खरेदी ...

कंपनीत भंगार चोरी करणारे आणि खरेदीदार अटकेत
रवी गणेश गायकवाड (३६), गणेश सांडू साळवे (४८), योगेश रावसाहेब गायकवाड (२०, सर्व राहणार ब्रीजवाडी) आणि चोरीचा माल खरेदी करणारा भंगार व्यावसायिक शेख अन्सार शेख अब्दुल अजिम(२३) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तक्रारदार क्षितिज प्रकाश अग्रवाल (४२, रा. सिडको एन ३) यांची चिकलठाणा एमआयडीसीमध्ये नुमा कास्ट आयर्न प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. १ डिसेंबर रोजी रात्री कंपनी बंद करून ते वाॅचमनला सांगून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते कंपनीत गेले असता कंपनीच्या आवारातील सुमारे ३०० किलो स्क्रॅप चोरीला गेल्याचे त्यांना दिसले. कंपनीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज त्यांनी तपासले असता चोरट्यांनी कंपनीच्या कंपाउंड वॉलवरून उड्या मारून स्क्रॅप चोरल्याचे दिसले. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे, हवालदार मुनीर पठाण, रत्नाकर बोर्डे आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून अवघ्या काही तासांत रेकॉर्डवरील आरोपी रवी गायकवाड आणि गणेश साळवे यांना संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देत तिसऱ्या साथीदाराचे नाव सांगितले. शिवाय चोरलेला माल भंगार दुकानदार शेख अबरार याला विक्री केल्याची माहिती दिली. पोलिसांनी लगेच योगेश गायकवाड आणि भंगार खरेदी करणाऱ्या आरोपीला अटक केली. आरोपी अब्रारच्या दुकानातून १४० किलो भंगार जप्त केले.
चौकट
आरोपींना एक दिवस कोठडी
अटकेतील आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता. आरोपींकडून उर्वरित भंगार जप्त करणे आहे, यामुळे पोलीस कोठडीची विनंती न्यायालयास करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलीस निरीक्षक पोटे यांनी दिली.