शहरं
Join us  
Trending Stories
1
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
2
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
3
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
4
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
5
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
6
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
7
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
8
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
9
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
10
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
15
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
16
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
17
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
18
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
19
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
20
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
Daily Top 2Weekly Top 5

उपक्रमांचा सुकाळ; डॉक्टरांचा दुष्काळ !

By admin | Updated: September 25, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या २७ योजना, उपक्रम राबविले जात आहेत. तसेच नियमित आरोग्य सेवा पुरविणेही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.


उस्मानाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या २७ योजना, उपक्रम राबविले जात आहेत. तसेच नियमित आरोग्य सेवा पुरविणेही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र वर्ष-वर्ष डॉक्टरांची पदे भरली जात नाहीत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. एकूणच हे चित्र पाहिल्यानंतर उपक्रमांचा सुकाळ तर डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा दुष्काळ असल्याचे समोर येते. याचा फटका रुग्णसेवेसोबतच उपक्रमांनाही बसत आहे.
जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या ४२ च्या आसपास आहे. तर उपकेंद्राचा आकडा याच्या दुप्पट आहे. या आरोग्य केंद्रासाठी किमान ८४ डॉक्टरांचा आवश्यकता आहे. मात्र एखादे पद रिक्त झाल्यानंतर ते वेळेवर भरले जात नाही. त्यामुळेच रिक्त पदांचा आकडा महिन्यागणिक वाढत चालला आहे. आजघडीला ५० टक्केही डॉक्टर कार्यरत नाहीत. हीच अवस्था अन्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोमात गेली की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याचा फटका निश्चितच खेडोपाड्यातील सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. तसेच विविध उपक्रम आणि योजनाही पूर्ण क्षमतेने राबल्या जात नाहीत.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, माता मृत्यू आढावा, बाल आरोग्य, बालस्वास्थ्य कार्यक्रम, नवसंजीवन योजना, नियमित लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम, अर्श, गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र, कायदा १९९४, वैद्यकीय गर्भपात कायदा, प्रजनन व बाल आरोग्य प्रशिक्षण, नागरी आरसीएच कार्यक्रम, सहाय्यक अनुदान, मदर अँड चाईल्ड ट्रॅकींग सिस्टीम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, किमान गरजा कार्यक्रम, रुग्णालयीन सेवा, मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम १९९४, राष्ट्रीय मासिक आरोग्य कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मुलन आणि क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविले जातात. परंतु हे कार्यक्रम पूर्ण क्षमतेने राबविण्याइतकी प्रशासनाकडे क्षमता नाही. डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे नियमित आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. अनेकवेळा संतप्त ग्रामस्थ रुग्णालयाला ताळे ठोकत आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाच्या हाती काहीच उरले नसल्याने आश्वासने देण्यापलीकडे काहीच करता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांचा प्रश्न फारच गंभीर बनला आहे. त्यामुळेच मदर अँड चाईल्ड ट्रॅकींग सिस्टीमसारखा उपक्रम फारसा प्रभावी ठरताना दिसत नाही. (प्रतिनिधी)