शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शाळांमध्ये सर्व सुविधा देणार

By admin | Updated: June 19, 2014 00:22 IST

जालना : शहरातील पालिकेच्या सर्व शाळांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी मंगळवारी दिले.

जालना : शहरातील पालिकेच्या सर्व शाळांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी मंगळवारी दिले.पालिकेच्या कार्यालयात सात तासांच्या दीर्घ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. जालना शहरात नगरपालिकेच्या एकूण २१ शाळा आहेत. प्रत्येक शाळेत संगणक कक्ष अद्ययावत करण्याची सूचना देण्यात आली. सर्वशिक्षा अभियानच्या १० बाबींनुसार या शाळांमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. यावर्षी या शाळांमध्ये किती विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला, याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी मागविली आहे. मोफत पाठ्यपुस्तके वितरण पूर्णपणे झाले का, याचीही त्यांनी माहिती घेतली. २०९ वाहनांचा प्रस्तावपालिकेची अनेक वाहने नादुरूस्त, बंद आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन २०९ वाहनांची गरज आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागीय नगरपालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आलेला आहे. पालिकेची रेकॉर्डरूम अद्ययावत ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तेथे पेपरलेस काम व्हावे. याशिवाय बांधकाम विभागाला पालिकेची खुली जागा, रस्ते आणि इमारती याबाबतची अद्ययावत माहिती असलेले तीन रजिस्टर ठेवण्याची सूचना करण्यात आली. (प्रतिनिधी)कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्तीनगरपालिकेतील विभागनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्टाफची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. एक-दोन विभाग वगळता सर्वच विभागांमध्ये मंजूर पदांपेक्षा कार्यरत कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे काही ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात येणार आहे. काही सफाई कामगार महसूल अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी किंवा अन्यत्र कामावर आहेत. त्यांना परत सफाईच्या कामावर नियुक्त करण्यात येणार आहे.