शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

शाळा ६ दिवसांपासून कुलूपबंद

By admin | Updated: July 17, 2014 00:22 IST

निवघाबाजार: येथून जवळच असलेल्या जि़ प़ शाळा बोरगावच्या शाळेला मागील सहा दिवसांपासून कुलूप बंद आहे़ यावर अद्याप तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़

निवघाबाजार: येथून जवळच असलेल्या जि़ प़ शाळा बोरगावच्या शाळेला मागील सहा दिवसांपासून कुलूप बंद आहे़ यावर अद्याप तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ बोरगावच्या शाळेत शिक्षकांची चार पदे रिक्त आहेत़ वारंवार मागणी करुनही दूर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी संतप्त पवित्रा घेत ११ जुलै रोजी शाळेला कुलूप लावले़ सहा दिवस लोटले तरी ही स्थिती अद्याप कायम आहे़ याबाबत केंद्रप्रमुख एस़ डी़ शिंदे यांना विचारणा केली असता पंचायत समितीला ६० शिक्षक आलेत, त्यापैकी ४० शिक्षक त्या-त्या शाळेत नियुक्त झाले आहेत़ आणखी २० शिक्षक शिल्लक आहेत़ पैकी काही शिक्षक निवघा केंद्रात पाठविले तर शाळेचे कुलूप लागण्याचे प्रकार थांबतील़ गटशिक्षणाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल स्वीच आॅफ होता़बोरगाव (ह) येथील जि़प़ शाळेच्या रिक्त शिक्षकांच्या भरतीसंदर्भात वेळोवेळी शिक्षण विभागाला कळविले़ परंतु आमच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले़ किमान दोन शिक्षक नियुक्त होईपर्यंत शाळेचे कुलूप काढणार नसल्याचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदराव देशमुख यांनी सांगितले़शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ रिक्त शिक्षकांची पदे भरल्याशिवाय शाळेचे कुलूप न काढण्याचा पवित्रा सरपंच लक्ष्मीबाई वामनराव कदम यांनी घेतला आहे़ शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून उपलब्ध शिक्षक शाळेबाहेर विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत़ (वार्ताहर)नुकतेच पंचायत समितीला ६२ शिक्षक मिळाले, त्यापैकी एक शिक्षक बोरगावच्या जि़प़ शाळेला दिला़ परंतु ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समिती किमान दोन शिक्षक दिल्याशिवाय शाळेचे कुलूप काढणार नसल्यावर अडून बसले आहेत़ एक-दोन दिवसात यावर तोडगा निघेल - अशोक जीवने, शिक्षण विस्तार अधिकारीशाळेला कुलूप असल्याने सहा दिवसांपासून शालेय पोषण आहार बंद आहे़ यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला़ तर शाळा व्हरांड्यात बसत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष बाहेर राहत आहे़ यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे सांगितले़ सध्या पावसाळा असल्याने पाऊस आला की विद्यार्थी भिजत आहेत - एस़बी़ पाटील, मुख्याध्यापक