शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

अवकाळी पावसाने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:03 IST

जिल्ह्यात सोमवारी (दि.१९) सायंकाळी सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (दि.१९) सायंकाळी सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली, तर सोयगावात तुरळक ठिकाणी बारीक गारा पडल्या. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले.

चिंचोली लिंबाजीसह परिसराला सोमवारी रात्री वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपले. अर्धा तास पाऊस झाल्याने मका, गहू, हरभरा, कांदा, कांदा बियाणे यासह भाजीपाला व फळबागांना फटका बसला. चिंचोली लिंबाजीसह नेवपूर, वाकी, तळनेर, घाटशेंद्रा, टाकळी अंतूर, लोहगाव, बरकतपूर, रायगाव, वाकद, गणेशपूर, जामडी, दहीगाव, शेलगाव, दिगाव, खेडी परिसरात रात्री ८ च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने शेतकºयांची चांगलीच धांदल उडाली.

सध्या परिसरात शेतकºयांची गहू, हरभरा, मका काढणी सुरू आहे. अचानक आलेल्या या आस्मानी संकटामुळे अनेकांच्या जमा करून ठेवलेल्या राशी पावसाने भिजल्या. यामुळे शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.अंभईसह पिंपळदरी, लिहाखेडी परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात सुमारे अर्धा तास जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.सोमवारी सायंकाळी ७.१० ला सुरू झालेला पाऊस ७.४० पर्यंत सुरू होता. अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे गंजी घालून ठेवलेला मका झाकण्यासाठी व उघड्यावर बांधलेली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकºयांची एकच तारांबळ उडाली

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव, उपळी, अंधारी, अजिंठा, गोळेगाव, आमठाणा, आमखेडा, घटांब्री, पानवडोद येथे पावसाने सायंकाळी हजेरी लावली. सोयगाव तालुक्यासह बनोटीत मेघगर्जनेसह पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील अनेक गावांची वीज गुल झाली होती. यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला, तर फुलंब्री तालुक्यात रात्री ९.२५ वाजता पावसाला सुरुवात झाली होती.

सोयगावात तुरळक गारांचा पाऊससोयगाव/फर्दापूर : सोयगाव तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. सोयगाव शहरासह तालुक्यात काही ठिकाणी बारीक गारांचा पाऊस झाल्याचे नागरिकांनी सांगितले, तर फर्दापूर येथे सायंकाळी ६ वाजता वादळी वाºयासह विजांच्या कडकडाटात जवळपास अर्धा तास रिमझिम पाऊस झाला. यामुळे शेतकºयांसह नागरिकांची पिके वाचविण्यासाठी धावपळ उडाली. दरम्यान, फर्दापुरात वीज गुल झाल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादagricultureशेती