शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाकोटी रुपये थकित

By admin | Updated: July 20, 2014 00:32 IST

विठ्ठल कटके , रेणापूर राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़

विठ्ठल कटके , रेणापूरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी स्वखर्चातून ठिबक व तुषार संच खरेदी केले़ परंतु, यातील ९०० शेतकऱ्यांचे जवळपास सव्वाकोटी रूपयांचे अनुदान थकित राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ अनुदानासाठी दररोज तालुका कृषी कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत़केंद्र व राज्य शासनाकडून अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजना आहे़ या योजनेअंतर्गत ठिबक व तुषार संचासाठी अल्पभुधारकांना ६० टक्के तर बहुभूधारकांना पन्नास टक्के अनुदान दिले जाते़ रेणापूर तालुक्यातून सन २०१२-१३ या वर्षात ठिबक व तुषार संच खरेदीसाठी एकूण १ हजार २०५ शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले़ त्यातील ९ प्रस्ताव कृषी खात्याने नाकारून १ हजार १९६ प्रस्ताव अनुदानासाठी पात्र ठरविले़ मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी १ लाख ते २ लाख रुपये स्वत: खर्च केला़ या प्रस्तावापैकी शासनाकडून २७४ शेतकऱ्यांना सन १०१२-१३ मध्ये ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़त्यानंतर तालुका कृषी विभागाने ९२२ प्रस्तावांना पूर्वसंमती दिली. त्यांची तपासणी करून सर्व प्रस्ताव लातूरच्या उपविभागीय कृषी कार्यालयाकडे पाठविले़ परंतु, या शेतकऱ्यांचे केंद्र शासनाचे एक कोटी दहा लाख व राज्य शासनाचे २८ लाख असे एकूण १ कोटी ३८ लाख रूपये अनुदान अद्याप मिळाले नाही़ अनुदान मिळावे म्हणून शेतकरी एक वर्षापासून तालुका कृषी कार्यालयाकडे खेटे घालत आहेत़ अनुदान मिळेल या अपेक्षेने या शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून बँकेकडून कर्ज काढून ठिबक व तुषार संच खरेदी करून त्याचा वापर सुरू केला़ परंतु, अनुदान रखडल्यामुळे हे सर्व शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ हे अनुदान लवकर देण्याची मागणी होत आहे़ शेतकरी आर्थिक संकटात़़़या योजनेअंतर्गत दोन एकरावर स्वत:चे ९० हजार रूपये खर्चून ठिबक संच बसविला़ सव्वा इंच बोअरच्या पाण्यावर बागायती शेती करण्याचे धाडस केले़ परंतु, निसर्गाची अवकृपा व शासनाकडून अनुदान न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडल्याचे कामखेडा येथील दिगंबर गिरी या शेतकऱ्याने सांगितले़सन २०१२-१३ वर्षात तालुक्यात या योजनेतंर्गत २७४ शेतकऱ्यांना ७२ लाख ३५ हजार ६०३ रूपयांचे अनुदान अदा करण्यात आले़ उर्वरित ९२२ शेतकऱ्यांचे जवळपास १ कोटी ३८ लाख रूपयांचे अनुदान रखडले आहे़ शासनाकडून अनुदान मिळताच ते वाटप करण्यात येईल, असे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव यांनी सांगितले़