सेवलीत दुकान फोडून ऐवज लंपास
By Admin | Updated: July 27, 2015 01:09 IST2015-07-27T00:41:18+5:302015-07-27T01:09:49+5:30
जालना : तालुक्यातील सेवली येथील एक दुकान फोडून चोरट्यांनी १४ हजारांचा एवज लंपास केल्याची घटना शनिवारी उशिरा घडली.

सेवलीत दुकान फोडून ऐवज लंपास
जालना : तालुक्यातील सेवली येथील एक दुकान फोडून चोरट्यांनी १४ हजारांचा एवज लंपास केल्याची घटना शनिवारी उशिरा घडली.
सेवली येथील अशोक शिवाजी गिराम यांचे बाजार पट्टी भागात महाराजा मेन्स पार्लर व आॅनलाईन लॉटरी तिकीट विक्रीचे दुकान आहे. शनिवारी रात्री १० वाजता आपले दुकान बंद करून ते घरी गेले असता मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानातील दरवाजाच्या खालील विटा काढुन आत प्रवेश करीत दुकानातील १४ हजारांचे साहित्य चोरून नेले. रविवारी सकाळी ८ वाजता दुकान उघडल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ या बाबत सेवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. याप्रकरणी गिराम यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहेकॉ. गौड हे करीत आहे. (प्रतिनिधी)