शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत सातव यांचा ४९ लाख तर वानखेडे यांचा ४५ लाखांचा खर्च

By admin | Updated: June 19, 2014 00:21 IST

हिंगोली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. राजीव सातव यांचा ४९ लाख १७ हजार ७२३ रुपयांचा खर्च झाला

हिंगोली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. राजीव सातव यांचा ४९ लाख १७ हजार ७२३ रुपयांचा खर्च झाला असून, शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा ४५ लाख ५४ हजार ८०८ रुपयांचा खर्च झाल्याची माहिती बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे खर्च सादर केल्यानंतर या खर्चाची पडताळणी करण्यात आली. त्या अनुषंगाने बुधवारी हिंगोली लोकसभेचे खर्च विभागाचे निरीक्षक जी. प्रकाश हिंगोलीत आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीअंती निवडणुकीतील उमेदवारांचे खर्च निश्चित करण्यात आले. याबाबतची अंतिम आकडेवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर देण्यात आली. त्यानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. राजीव सातव यांचा या निवडणुकीत एकूण ४९ लाख १७ हजार ७२३ रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये २२ लाख ८३ हजार रुपये प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांवर खर्च करण्यात आले असून, ६७ हजार ६६८ रुपये प्रसारमाध्यमांमधील प्रचार कार्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. तसेच २५ लाख ६७ हजार ५५ रुपये जाहीर सभा, मेळावे व मिरवणुकांसाठी खर्च करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहेत. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांचा या निवडणुकीत ४५ लाख ५४ हजार ८०८ रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामध्ये प्रचार कार्यासाठी वापरलेल्या वाहनांकरिता १८ लाख २४ हजार २१६ रुपये खर्च करण्यात आले असून, प्रचार-प्रतिनिधी यांच्यासाठी १ लाख ८७ हजार ४०० रुपये खर्च करण्यात आला आहे. तसेच २५ लाख ४३ हजार १९२ रुपये जाहीर सभा, मेळावे व मिरवणुकांसाठी खर्च करण्यात आले असल्याचे यासंदर्भातील विवरण पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. अन्य उमेदवारांमध्ये बसपाचे चुन्नीलाल जाधव यांचा ७ लाख ८९ हजार ३०८ रुपये तर माकपचे डी.बी.नाईक यांचा ८ लाख ३२ हजार ४३४ रुपयांचा खर्च झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)