निकामी किडनीच्या रूग्णांना संजीवनी
By Admin | Updated: August 19, 2014 02:08 IST2014-08-19T01:26:06+5:302014-08-19T02:08:04+5:30
हिंगोली : अत्यंत गंभीर आणि दुर्धर असलेल्या किडनी निकामी होण्यासारख्या महागड्या आजारांच्या रूग्णांना हिंगोलीतच डायलेसीस सेवा मिळाल्यामुळे संजीवनी मिळाली.

निकामी किडनीच्या रूग्णांना संजीवनी
हिंगोली : अत्यंत गंभीर आणि दुर्धर असलेल्या किडनी निकामी होण्यासारख्या महागड्या आजारांच्या रूग्णांना हिंगोलीतच डायलेसीस सेवा मिळाल्यामुळे संजीवनी मिळाली. आठवड्यात दोनदाच्या डायलेसीससाठी खासगी रूग्णालयात अडीच हजार रूपये मोजावे लागत असताना सामान्य रूग्णालयात नाममात्र दीडशे रूपयांत लाभ मिळू लागला. एकमेव सामान्य रूग्णालयातच ही सेवा उपलब्ध झाल्याने पायपीट थांबून रूग्णांचे कोट्यवधी रूपये वाचले.
आजारात किडनी निकामी झाल्यामुळे शरीरातील मलमूत्र बाहेर निघत नाही. म्हणून मशिन्सद्वारे रूग्णांच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढले जातात. परिणामी, आठवड्यातून दोन किवा तीनवेळा डायलेसीस करावी लागते. यापूर्वी हिंगोलीतील कोणत्याही रुग्णालयात उपचार मिळत नसल्यामुळे रुग्णांची पायपीट होत होती. कमजोर रुग्णांना आठवड्याला परजिल्ह्याच्या वाऱ्या कराव्या लागायच्या. आशा रुग्णांना जीवितासाठी किडनी बदलणे किंवा डायलेलीसवाचून पर्याय नव्हता. दोन्हीही पर्याय महागडे असल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे अवसानच गळून जात होते. दुसरीकडे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत डायलेसीस सेवा मिळू लागली. त्यामानाने हिंगोलीत या सेवेला विलंब झाला. नववर्षाच्या दुसऱ्या दिवशी सामान्य रुग्णालयात या सेवेला प्रारंभ झाला. आजपर्यंत १३ रुग्णांनी ४०४ वेळा डायलेलीसचा लाभ घेतला.
एकूण चारपैकी १ मशिन संसर्गजन्य आणि एचआयव्ही रुग्णांसाठी राखीव ठेवली. स्वतंत्र विभाग आणि कुशल कर्मचाऱ्यांमुळे वाशिम जिल्ह्यातूनही एक रुग्ण नियमित उपचारासाठी यतो. एकावेळी औषधींसहित अडीच हजार रूपये मोजावे लागणाऱ्या रुग्णांना दीडशे रुपयांत सेवा उपलब्ध झाली. रुग्णांची पायपीटही थांबल्याने गरजूंना आधार मिळाल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
मधुमेह, उच्चरक्तदाब, मुत्रपिंडांचे आजार, लघवी बंद होणे, रक्तात मुत्राचे प्रमाण वाढणे, रक्तातील क्रीयटीनीन व पोटॉश वाढणे ही किडनी निकामी होण्याचे तर रक्त कमी होणे, दम लागणे, पायावर सूज येणे ही मुत्रपींड खराब झाल्याची लक्षणे आहेत.
- डॉ. यशवंत पवार, एमओ, सामान्य रुग्णालय, हिंगोली.
सेनगाव तालुक्यातील कहाकर येथील भागवत शिंदे नियमित उपचार घेत होते. एकूण १७ वेळा डायलेसीस केल्यानंतर शिंदे यांनी किडनी बदलण्याचा निर्णय घेतला. राजीव गांधी जीवनदायी योजनेत नव्यानेच ही बाब सामाविष्ट झाली होती. मुंबईत शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
४किडनी विकार तज्ज्ञ डॉ. संतोष दुरूपकर, फिजिशियन डॉ. यशवंत पवार, डॉ. किरण कुऱ्हाडे, डॉ. सुनील गायकवाड, डायलेसीस तंत्रज्ञ अरविंद कदम, एजाज पठाण, अधिपरिचारिका रतन बोरा, वर्षा घुगे, रमेश जाधव.
जानेवारी१६
फेब्रुवारी ३४
मार्च ४६
एप्रिल ५६
ं मे ७३
जून ६०
जुलै ८२
आॅगस्ट ३६