शेतकऱ्यांसाठी संजीवनी योजना

By Admin | Updated: July 3, 2014 00:20 IST2014-07-02T23:24:08+5:302014-07-03T00:20:42+5:30

जालना : महावितरणची जालना जिल्ह्यातील कृषीपंपधारक २ लाख ९५ हजार ४६३ शेतकऱ्यांकडे ६३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे.

Sanjeevan Yojna for farmers | शेतकऱ्यांसाठी संजीवनी योजना

शेतकऱ्यांसाठी संजीवनी योजना

जालना : महावितरणची जालना जिल्ह्यातील कृषीपंपधारक २ लाख ९५ हजार ४६३ शेतकऱ्यांकडे ६३० कोटी ३६ लाख ४६ हजार रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्ती मिळण्यासाठी शासनाने व महावितरण कंपनीकडून कृषि संजीवनी योजना-२०१४ राबण्यिात येत आहे.
शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे ३१५ कोटी १८ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केल्यास त्यांना ६८५ कोटी ५० लाख १८ हजार रुपये व्याज व दंडाची माफी मिळणार आहे.
कृषि संजीवनी योजना २०१४ या योजनेत चालू कृषीपंपधारकांना ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या एकूण थकबाकी पैकी निव्वळ ५० टक्के रक्कम एकरकमी आॅगस्ट २०१४ पर्यंत भरता येईल. अन्यथा ५० टक्के मुळ थकबाकीच्या रक्कमेत तीन मासिक हप्ते म्हणजे ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के, ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत २० टक्के व ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत उरलेली १० टक्के रक्कम भरता येईल. तसेच या योजनेत १ एप्रिल २०१४ पासूनची सर्व चालू बिले पूर्णपणे व ििनयमित भरणे आवश्यक आहे. अशा ग्राहकांना पुढील दोन त्रैमासिक बिलांमध्ये ५० टक्के माफी दिली जाणार आहे. ही रक्कम शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरुपात मिळणार आहे.
जिल्ह्यात मार्च २०१४ अखेर शेतीपंपाचे १ लाख २ हजार ३२१ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची २६२ कोटी ९४ लाख ८० हजार रुपयांची थकबाकी आहे. कृषि संजीवनी योजनेनुसार शेतकऱ्यांनी ५० टक्के रक्कम १३१ कोटी ४७ लाख ४० हजार रुपये भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम टप्प्यात ३१ आॅगस्ट २०१४ पर्यंत २० टक्के म्हणजे ५२ कोटी ५८ लाख ९६ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. तिसऱ्या टप्प्यात ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के म्हणजे ३६ कोटी ७४ लाख १७ हजार रुपये भरणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना ३६५ कोटी ३१ लाख ८३ हजार १९३ रुपये व्याज व दंडाची ७ कोटी ३४ लाख ८६ हजार रुपये म्हणजे ३७२ कोटी ६६ लाख ६६ हजार रुपये माफ होणार आहेत.
या कृषि संजीवनी योजनेत सहभागी न होणाऱ्या ग्राहकांना अपात्र ठरविण्यात येईल. त्यांना व्याज व दंड माफीचा फायदा मिळणार नाही. शेतीपंप वीज ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेऊन जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, या योजनेचा जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकी भरावे, असे आवाहन महावितरणचे कार्यकारी अभियंता मासूळ यांनी केले. (वार्ताहर)
बिलावरील व्याज व दंड होणार माफ
शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के म्हणजे ३१५ कोटी १८ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केल्यास त्यांना ६८५ कोटी ५० लाख १८ हजार रुपये व्याज व दंडाची माफी मिळणार आहे.
शेतीपंपाचे १ लाख २ हजार ३२१ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची २६२ कोटी ९४ लाख ८० हजार रुपयांची थकबाकी आहे.

Web Title: Sanjeevan Yojna for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.