शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

संजय कच्छवे यांच्यावरील शहर प्रवेश बंदी उठविली

By admin | Updated: September 6, 2014 00:29 IST

पाथरी: नामदेवनगरच्या घटनेप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कच्छवे यांना पाथरी शहरात येण्यास घालण्यात आलेली बंदी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अटींच्या अधारे उठविण्यात आली आहे.

पाथरी: नामदेवनगरच्या घटनेप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कच्छवे यांना पाथरी शहरात येण्यास घालण्यात आलेली बंदी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही अटींच्या अधारे उठविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कच्छवे यांना पाथरी शहरात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी शिवसेनेने आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनालाही स्थगिती देण्यात आली आहे.पाथरी शहरातील नामदेवनगरच्या वादग्रस्त जागेवरुन १ सप्टेंबर रोजी शहरातील माळीवाडा परिसरात दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. याच घटनेच्या अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय कच्छवे यांना गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन होईपर्यंत पाथरी शहरात येण्यास प्रशासनाने बंदी घातली होती. प्रशासनाच्या या भूमिकेच्या विरोधात आ.मीराताई रेंगे यांनी पत्र परिषद घेऊन कारवाईला स्थगिती द्यावी, यासाठी रास्ता रोको व गणेश विसर्जन होऊ देणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली होती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाच्या आवाहनावरुन उपजिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी डॉ.कच्छवे यांच्यावर घातलेली पाथरी शहर बंदी काही अटींवर उठविली आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही व प्रक्षोभक भाषणावर निर्बंध घातले आहेत. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली.