शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

६३ लाखांच्या ठेक्यातून उपसली २७ कोटींची वाळू; छत्रपती संभाजीनगरात खुलेआम लूट

By विकास राऊत | Updated: June 6, 2025 19:48 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संशयाच्या भोवऱ्यात; वाळू उपसण्यासाठी दिलेल्या ठेक्यातून प्राधिकरणाने नेमलेल्या कंत्राटदाराने १८ हजार ब्रास वाळू जास्तीची उपसली

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वॉटर ग्रीड व जलजीवन मिशन योजनेच्या कामासाठी गंगापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रातील सनव या राखीव वाळू पट्ट्यातून ९ हजार ६०० ब्रास वाळू उपसण्याचा ठेका ६३ लाख ६० हजार रुपयांच्या रॉयल्टीत जिल्हा प्रशासनाकडून घेतला. वाळू उपसण्यासाठी दिलेल्या ठेक्यातून प्राधिकरणाने नेमलेल्या कंत्राटदाराने १८ हजार ब्रास वाळू जास्तीची उपसली असून, दंडात्मक कारवाईसह २७ कोटी रुपयांची ही वाळू असल्याचा प्राथमिक अहवाल एसडीओ संतोष गोरड व पथकाने गुरुवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दिला.

या अहवालात वाळूच्या बाजारमूल्यासह जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांवर निलंबनासह वेतनातून दंड वसुलीचा प्रस्ताव, फौजदारी कारवाई, पर्यावरण कायद्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे नमूद आहे. शासनाचा बुडालेला २७ कोटींचा महसूल कसा वसूल करायचा, हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दंडात्मक कारवाई आदेशानंतर स्पष्ट होईल. ‘लोकमत’ने ४ व ५ जूनच्या अंकात महसूल यंत्रणेला प्राधिकरण कसा चुना लावत आहे, याचे बिंग फोडल्यानंतर महसूल प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली.

सवन वाळूपट्ट्यातील शासकीय योजनेची वाळू उपसून ती खुल्या बाजारात बोगस चालानच्या आधारे आणल्याचे एक प्रकरण १६ मे रोजी समोर येऊनही गौण खनिज विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. ४ जून रोजी १ मीटरपेक्षा जास्तीचे उत्खनन झाल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी एसडीएम संतोष गरड व पथकाला घेऊन छापा मारल्यानंतर समोर आल्यावर मंडळ अधिकारी, तलाठ्यावर निलंबनाची कारवाई झाली.

तहसीलदार, एसडीओची विभागीय चाैकशीप्राधिकरणाला ९६०० ब्रास वाळू हवी होती. तेवढी उपसल्यानंतर ठेका बंद करणे गरजेचे हाेते. प्राधिकरणाने यंत्रणा नसल्यामुळे एका कंत्राटदाराला वाळू उपसण्याचे कंत्राट दिले. त्याने दुसऱ्याला दिले. याचा कुठलाही रेकॉर्ड नाही. हे फक्त प्राधिकरणालाच माहिती होते. यावरून जिल्हाधिकारी स्वामी यांनी प्राधिकरणाचे अभियंता कोळी यांना गुरुवारी फैलावर घेतले. ज्या कंत्राटदारांनी वाळू उपसली त्यांच्याकडून रेकॉर्ड घेत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. गंगापूर तहसीलदार नवनाथ वाघवाड, उपविभागीय अधिकारी अरुण जऱ्हाड यांच्या हद्दीत हा सगळा कारभार सुरू असताना त्यांच्या मूकसंमतीनेच सर्व नियमांच्या उल्लंघनासह नदीपात्र व पर्यावरण समितीच्या नियमांची वाट लागली. त्या दाेघांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

पूर्ण मूल्यांकनाअंती दंडात्मक कारवाईमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलेला प्रकार क्षमस्व नाही. हा सगळा प्रकार त्यांच्या प्रधान सचिवांकडे निवेदनाद्वारे मांडणार आहे. २८ हजार ब्रास वाळू उपसली असून, त्यातील १८ हजार ब्रास बेकायदेशीररीत्या उपसली आहे. पाचपट दंडासह जी काही रक्कम होते त्याच्या पूर्ण मूल्यांकनाअंती प्राधिकरणासह त्यांनी नेमलेल्या कंत्राटदारांवर बोजा टाकण्याचा निर्णय होईल.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरsandवाळूCrime Newsगुन्हेगारी