वाळूची वाहतूक करणारी वाहने जप्त
By Admin | Updated: June 16, 2014 00:12 IST2014-06-15T23:57:26+5:302014-06-16T00:12:35+5:30
पालम : गोदावरीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांच्या पथकाने पेठशिवणी येथे पकडली.

वाळूची वाहतूक करणारी वाहने जप्त
पालम : गोदावरीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांच्या पथकाने पेठशिवणी येथे पकडली. या वाहनधारकांकडून १६ हजारांचा दंड वसूल केला आहे.
गोदावरीच्या पात्रातून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. ही वाळू रात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पेठशिवणीजवळ वाळूची वाहने वाहतूक करीत असल्याचे निदशर््ानास आले. या वाहनचालकांकडे पावत्या नसल्याने पोलिसांनी कारवाई करीत दंड वसूल केला आहे. एम. एच. ०४-१६३४ हा ट्रक, एम. एच. ०४-१६३६ हा टिप्पर या दोन्ही वाहनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि रावसाहेब गाडेवाड यांच्या फिर्यादीवरून दयानंद मलकापुरे, शिवदास बलांडे (रा. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत केंद्रे प्रभाकर राठोड, दीपक जाधव हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
आरटीओंची कारवाई
पालम तालुक्यातील अवैध वाळूच्या वाहतुकीवर परभणी येथील आरटीओ कार्यालयातील पथकानेही कारवाई केली आहे. पालम पोलिसांबरोबरच आरटीओच्या पथकाने कारवाई करीत हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे वाळूची चोरी करणाऱ्या वाहनधारकाचे धाबे दणाणले आहेत.