वाळू तस्करी, वृक्षतोड, अवैध धंद्यांना बरकत

By Admin | Updated: June 2, 2014 01:33 IST2014-06-02T01:17:28+5:302014-06-02T01:33:56+5:30

सुनील घोडके , खुलताबाद खुलताबाद तालुक्यात वाळू तस्करी, वृक्षांची कत्तल यांना ऊत आला असून, अवैध धंद्यांना बरकत आली आहे.

Sand smuggling, trees, illegal businesses | वाळू तस्करी, वृक्षतोड, अवैध धंद्यांना बरकत

वाळू तस्करी, वृक्षतोड, अवैध धंद्यांना बरकत

सुनील घोडके , खुलताबाद खुलताबाद तालुक्यात वाळू तस्करी, वृक्षांची कत्तल यांना ऊत आला असून, अवैध धंद्यांना बरकत आली आहे. या सर्व बाबींना प्रशासनाची ना- हरकत असल्याचे परिस्थितीवरून दिसून येत आहे. गदाना येथे पाच शेतकर्‍यांच्या शेतात मोठा वाळूपट्टा सापडला. गेल्या चार वर्षांत या शेतकर्‍यांनी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनास हाती धरून हजारो ब्रास वाळूची विक्री केली. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला. याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच महसूल प्रशासनाने सदरील वाळूपट्ट्याचा पंचनामा केला. त्यानंतर महिन्यानंतर सदरील शेतकर्‍यांना नोटिसा बजावल्या व त्या पाच वाळू विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना दीड ते अडीच लाखांपर्यंत दंड आकारण्यात आला. या संपूर्ण घटनाक्रमास तीन महिने झाले तरी अद्याप या प्रकरणी तहसीलने या वाळू तस्करांकडून एक रुपयाही दंड वसूल केला नाही. या प्रकरणाची फाईलही बंद झाल्याची चर्चा तहसील कार्यालयात ऐकावयास मिळत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून यातील काही वाळू माफिया या शेतातून रात्री वाळू विक्री करीत आहेत. हप्ता वसुलीचा घेतला पोलिसाने ठेका तालुक्यात बंद असलेली अवैध वाहतुकीची हप्ता वसुली पुन्हा सुरू झाली असून या वसुलीचा ठेका चक्क पोलिसाने घेतला आहे. हा पोलीस शासकीय जीप घेऊन स्वत: फिरून हप्ता द्यावा लागेल म्हणून दमबाजी करीत असल्याने वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागास गाढ झोप तालुक्यात लाकडाच्या व्यापार्‍यांनी हैदोस घातला असून, सर्रास आंबा, लिंब, बाभूळ व इतर झाडांची सर्रास कत्तल होत आहे. लाकडाने भरलेले ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर दिवसाढवळ्या गावातून आरा मशीनवर (सॉ मिल) वर जात आहे. शूलीभंजन, खुलताबाद येथील सॉ मिलवर लाकडे ठेवण्यास जागा शिल्लक नसल्याने लाकडाने खुलताबाद नगर परिषदेचे संपूर्ण मैदान भरत आहे. लाकडाची कटाई होऊन मुंबई व परराज्यात पाठविले जात आहे. आतापर्यंत अवैध वृक्षतोडीवर किती कारवाई करण्यात आली, हे स्पष्टपणे अधिकारी सांगू शकत नाही. गरिबांचे अतिक्रमण काढले, श्रीमंतांचे कधी काढणार? नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सविता हरकळ यांनी स्टेट बँकेसमोरील टपर्‍यांचे अतिक्रमण काढून मोठी कारवाई केल्याचा आव आणला आहे. पांगरा तलाव, धरमतलाव परिसरात झालेल्या अतिक्रमणांचे काय? गरिबांचे अतिक्रमण हटविले, श्रीमंतांनी केलेले अतिक्रमण केव्हा काढणार, असा प्रश्न खुलताबादकर विचारत आहेत. पोलीस फक्त नावालाच अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची गावागावात, हॉटेल-ढाब्यावर विक्री सुरू आहे. वेरूळ परिसरातील लोकांना कल्याण मटका नावाच्या जुगाराने चांगलाच चटका लावला आहे. खुलताबाद, कसाबखेडा, गल्लेबोरगाव, पळसवाडी परिसरातील लोक आकड्यात गुरफटलेले आहेत. खुलताबाद शहरात भिलवाडा, मंगलपेठ झोपडपट्टी, वेरूळ आदी ठिकाणी दररोज हातभट्टीची मोठी विक्री होते. भरवस्तीतही खुलेआम दारू सहज मिळते.

Web Title: Sand smuggling, trees, illegal businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.