फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर): समृद्धी महामार्गावर पोखरी शिवारातील एका पेट्रोल पंपासमोर ट्रक चालकाला मारहाण करून मोबाईल हिसकावणाऱ्या आणि डिझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा फुलंब्री पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ५ मार्च रोजी पहाटे केलेल्या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
नेमकी घटना काय?सलाद्दीन अलाउद्दीन साह (४५, रा. पालघर) हे आपल्या ट्रकने (MH-18-BA-0035) जालनाकडून मुंबईकडे माल घेऊन जात होते. बुधवारी रात्री १०:३० च्या सुमारास त्यांनी पोखरी शिवारात टायरमधील हवा तपासण्यासाठी ट्रक थांबवला. यावेळी अचानक सहा इसमांनी त्यांना गाठून मारहाण केली आणि त्यांचा २० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला.
नागरिकांच्या मदतीने आरोपी जेरबंदट्रकच्या क्लिनरने आरडाओरड केल्याने पेट्रोल पंपावरील नागरिक मदतीसाठी धावले. आरोपी डिझेल चोरीच्या तयारीत असल्याचे पाहून नागरिकांनी राजू खंडाळे, अभिषेक पवार, प्रशांत गायकवाड आणि कृष्णा आगळे या चौघांना पकडून ठेवले, तर विजय पवार आणि राहुल मुदगळ हे दोघे मोबाईल घेऊन पळून गेले.
कोयता आणि कॅन जप्तघटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे आरोपींची पिकअप (MH-19-CY-5264) आढळून आली. या वाहनातून डिझेल भरण्यासाठी लागणारे सहा कॅन, प्लास्टिक पाईप, कोयता आणि लोखंडी पाईप जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे पुढील तपास करीत आहेत.
Web Summary : Four arrested near Phulambri on Samruddhi Highway for attacking a truck driver and attempting to steal diesel. Citizens apprehended four; two escaped. Police seized weapons and diesel theft equipment.
Web Summary : समृद्धि राजमार्ग पर फुलंब्री के पास ट्रक ड्राइवर पर हमला कर डीजल चुराने की कोशिश करते हुए चार गिरफ्तार। नागरिकों ने चार को पकड़ा; दो भाग गए। पुलिस ने हथियार और डीजल चोरी के उपकरण जब्त किए।