शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या पाण्याची झेप छ. संभाजीनगराकडे; जलवाहिनीत ४ किमीपर्यंत २ कोटी लीटर पाणी आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 16:45 IST

मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा 'मिशन वॉटर' प्लॅन; ३८ किमी जलवाहिनी स्वच्छतेसाठी ८ दिवसांचे लक्ष्य २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी ४ किमीपर्यंत भरली;

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहराकडे झेपावण्यास सुरुवात झाली असून, मंगळवारी दुसऱ्या दिवशीही २५०० मि.मी. व्यासाच्या महाकाय जलवाहिनीत तब्बल ४ कि.मी.पर्यंत पाणी घेण्यात आले. हे पाणी दोन कोटी लिटर आहे. बुधवारी सकाळी पुन्हा ३७०० अश्वशक्तीचा पंप सुरू करून पाणी जलवाहिनीत घेतले जाईल. ९ कि.मी. जलवाहिनी शुद्ध करण्याचे उद्दिष्ट आहे.

सोमवारी रात्री मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते विधिवत पूजा करून जॅकवेलवर बसविण्यात आलेला ३७०० अश्वशक्ती पंप सुरू करण्यात आला होता. जायकवाडी धरणापासून पैठण साखर कारखान्यापर्यंत म्हणजेच ४ कि.मी.पर्यंत जलवाहिनी स्वच्छ करण्यात आली होती. जलवाहिनीत घेतलेले पाणी स्कोअर व्हॉल्व्हमधून बाहेर सोडण्यात आले होते. मंगळवारी दुपारी पंप सुरू करण्यात आला. एक तास सुरू ठेवून २ वाजता बंद केला. पंपाच्या कूलिंग यंत्रणेत थोडासा बिघाड होता. तो दुरुस्त करून पुन्हा पंप सुरू केला. सायं. ७.१५ वाजेपर्यंत पंप व्यवस्थित सुरू होता. ४ कि.मी.पर्यंत जलवाहिनी पूर्णपणे भरल्यानंतर पंप बंद केला. जलवाहिनीतील हे पाणी बुधवारी दुपारी पुढे ९ किमीपर्यंत नेले जाईल. तेथे स्कोअर व्हॉल्व्हमधून हे पाणी बाहेर सोडण्यात येणार असल्याची माहिती मजीप्रा व जीव्हीपीआर कंपनीतर्फे देण्यात आली. 

आठ दिवसांत जलवाहिनी स्वच्छ९ किमी जलवाहिनी स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण ३८ किमी जलवाहिनी अशाच पद्धतीने टप्प्याटप्प्याने स्वच्छ केली जाणार आहे. यासाठी किमान आठ दिवस लागतील. १४ एप्रिलपर्यंत नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी येईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.

सतर्कतेसाठी भोंगा फिरविणे सुरू-जॅकवेलमधील पाणी ३,७०० अश्वशक्तीच्या पंपद्वारे जलवाहिनीत पाणी घेण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरू आहे. जलवाहिनीवर ठराविक अंतरावर स्कोअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. जलवाहिनी शुद्ध करण्यासाठी ज्या ठिकाणी नदी, नाले आहेत, तेथे अशुद्ध पाणी सोडले जात आहे.-एकूण १२ ठिकाणी व्हॉल्व्ह आहेत. त्यात ॲप्रोच बंड चेनेज, साखर कारखाना, धनगाव, ढोरकीन, कौडगाव, निलजगाव, फारोळा, आर. एल. स्टील, अजित सीड्स, निसर्ग नर्सरी येथे पाणी सोडण्यात येईल. पाणी सोडल्यानंतर संबंधित भागात पूरसदृश परिस्थिती होईल.- नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे मजीप्राने कळविले आहे. मंगळवारी दिवसभर ज्या भागात पाणी सोडले जाईल, तेथे भोंगा लावून नागरिकांना सतर्क करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Water from Jayakwadi reaches Chhatrapati Sambhajinagar; pipeline fills 4km.

Web Summary : Water from Jayakwadi dam is now flowing towards Chhatrapati Sambhajinagar. The pipeline has been filled up to 4 km, containing two crore liters of water. Cleaning continues to ensure supply by April 14th.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीMunicipal Corporationनगर पालिका