चोरीच्या दुचाकी बँकेने जप्त केलेल्या असल्याची थाप मारून केल्या विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 19:21 IST2021-04-09T19:20:08+5:302021-04-09T19:21:34+5:30

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांतून ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती.

The sale of the stolen two-wheeler, claiming to have been confiscated by the bank | चोरीच्या दुचाकी बँकेने जप्त केलेल्या असल्याची थाप मारून केल्या विक्री

चोरीच्या दुचाकी बँकेने जप्त केलेल्या असल्याची थाप मारून केल्या विक्री

ठळक मुद्देअट्टल दुचाकी चोराच्या ताब्यातून ५ दुचाकी जप्त एमआयडीसी वाळूज पोलिसांची कामगिरी

वाळूज महानगर : बँकेने जप्त केलेल्या असल्याचे सांगून चोरी केलेल्या दुचाकी ग्राहकांना विक्री करणाऱ्या अट्टल दुचाकी चोर शेखर ऊर्फ अण्णा दांडगे (२८, रा. रेणुकाई पिंपळगाव, ता. भोकरदन, जि. जालना) याला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी ताब्यात आले. आरोपी दांडगे याने विविध ठिकाणांवरून चोरी केलेल्या १ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

वाळूज एमआयडीसी परिसरातील राजेश सत्यभान कांबळे यांची मोपेड (क्रमांक एम.एच.- २०, डी.एस.- ०७२९) व लक्ष्मण मनोहर यांची दुचाकी (क्रमांक एम.एच.- २०, सी.झेड.- ३९८०) या दोन दुचाकी दोन वर्षांपूर्वी अज्ञात चोरट्याने बजाजनगर परिसरातून लांबविल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सिल्लोड तालुक्यातून पारध पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दांडगे याला अटक केली होती. यावेळी आरोपींच्या ताब्यातून वाळूज एमआयडीसीतील लक्ष्मण मनोहर याची दुचाकी (क्रमांक एम.एच.- २० सी.झेड.- ३९८०) जप्त केली होती. दांडगेकडे सापडलेली दुचाकी वाळूज एमआयडीसी परिसरातील असल्याने एमआयडीसी वाळूज पोलिसांनी न्यायालयात हस्तांतरण वाॅरंट घेऊन शेखर दांडगे यास ७ एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते.

थाप मारून विक्री
पोलिसांच्या चौकशीत दांडगेेने औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यांतून ५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. विविध ठिकाणावरून चोरी केलेल्या दुचाकी आरोपी दांडगे हा आपल्या मूळ गावी घेऊन जात होता. बँकेने जप्त केलेली वाहने असल्याचे सांगत त्या विक्री करत होता. दांडगेने विक्री केलेल्या ५ दुचाकी खरेदीदाराकडून जप्त करण्यात आल्या आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गौतम वावळे, सहायक फौजदार कय्युम पठाण, पोना. प्रकाश गायकवाड, सुधीर सोनवणे, पोकॉ. नवाब शेख, धीरज काबिले, विनोद परदेशी, मनमोहन कोलिमी, रेवनाथ गवळे, दीपक मतलबे, विक्रम वाघ यांनी बजावली.

Web Title: The sale of the stolen two-wheeler, claiming to have been confiscated by the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.