साजापूरच्या भंगार विक्रेत्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:28 IST2019-06-01T23:28:23+5:302019-06-01T23:28:33+5:30

साजापूर येथे भंगार विक्रेत्यास मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sajapur scam dealer beaten up | साजापूरच्या भंगार विक्रेत्यास मारहाण

साजापूरच्या भंगार विक्रेत्यास मारहाण

वाळूज महानगर : साजापूर येथे भंगार विक्रेत्यास मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


साजापुरात शेख इस्माईल यांच्या टँकरवर काम करणारा पप्पू उबाळे हा टँकरमध्ये शिल्लक राहिलेले पाणी गावातील नागरिकांना वाटप करतो. दरम्यान, सलमा बानो ही पाणी भरण्यासाठी टँकरकडे जात असताना पप्पूचे वडील हिरामण उबाळे हे तिच्याकडे वाईटनजरने बघत असे.

त्यामुळे सलमाने पती समीरला याची माहिती दिली. समीरने हिरामण उबाळे यांना जाब विचारला असता त्याने समीरला शिवीगाळ केली. दरम्यान, २८ मे रोजी समीर अन्सारी हे भंगार विक्रीसाठी रांजणगाव येथे गेले असता हिरामण उबाळे व त्याची पत्नी अनिता या दोघांनी समीरला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. याप्रकरणी समीर अन्सारी यांच्या तक्रारीवरुन उबाळे दाम्पत्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Sajapur scam dealer beaten up