सेलूत रा़ काँ़च्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण

By Admin | Updated: June 24, 2014 00:42 IST2014-06-24T00:28:15+5:302014-06-24T00:42:57+5:30

सेलू : शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २३ जूनपासून उपोषण सुरू केले आहे़

Sailot Ranchi office bearers' fast | सेलूत रा़ काँ़च्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण

सेलूत रा़ काँ़च्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण

सेलू : शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २३ जूनपासून उपोषण सुरू केले आहे़
गारपिटीच्या अनुदानापासून अनेक गावे वंचित राहिली आहेत़ त्यामुळे उर्वरित नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी तसेच गारपीट व अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठीत कर्ज पुरवठा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ त्याची अंमलबजावणी संबंधितांकडून होत नाही त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत़ खरीप व रबी हंगामाकरीता शेतकऱ्यांना बँकांनी तत्काळ कर्ज पुरवठा करावा़ महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे अनेक गावे दत्तक आहेत़ परंतू बँकांच्या आडमुठी धोरणामुळे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ केली जात आहे़ तसेच स्टेट बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ हैदराबाद या बँकेकडे दत्तक असलेल्या गावांतील शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करावे़ बैलजोडी, ठिबक सिंचन, शेतीपूरक व्यवसाय, पाईपलाईन, विहीर खोदकाम, गोदाम बांधकाम, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बँकाना लक्ष्यपूर्ती देण्यात येणारे कर्ज तथा मदत वाढून देण्यात यावी तसेच राजीव गांधी योजनेत दोन घरांची बांधणी करण्याकरीता शासनाची योजना आहे़ मात्र या योजनेची अंमलबजावणी होत नसल्यामुळे नागरिकांना लाभ मिळत नाही़ तालुक्यातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करीत आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आहे़ बँकांनी शेतकरी व विद्यार्थ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी राकाँचे जिल्हाउपाध्यक्ष डॉ़ संजय रोडगे, विनायक पावडे, अशोक काकडे, प्रताप सोळंके, उपसभापती अ‍ॅड़ रामेश्वर शेवाळे, माऊली ताठे, सुधाकर रोकडे, शेख शफी, विठ्ठल कोकर, इसाक पटेल, प्रदीप कदम, ज्योती यादव, अर्चना सोळंके, संपत राठोड, राजेंद्र मोगल, गणेश गोरे, संतोष डख, राजकिशोर जैस्वाल, अप्पासाहेब रोडगे, विश्वनाथ गणगे आदींनी उपोषण सुरू केले आहे़

Web Title: Sailot Ranchi office bearers' fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.