शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आत्मा जागृतीसाठी साधना करावी

By admin | Updated: June 10, 2016 00:04 IST

औरंगाबाद : भगवंतासमोर बसून त्याची आराधना करणे, पूजा करणे याचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यायला हवा.

औरंगाबाद : भगवंतासमोर बसून त्याची आराधना करणे, पूजा करणे याचा अर्थ प्रत्येकाने समजून घ्यायला हवा. भगवंतांनी दाखविलेला मार्ग अनुसरण्याकरिता, आपला आत्मा जागृत करण्यासाठीच ती साधना असते. समग्र ज्ञान प्राप्तीसाठीच ती उपासना असते. आत्मा हा सर्वशक्तिमान आहे आणि त्याच माध्यमातून आपण स्वर्ग, मोक्षाची प्राप्ती करवून घेऊ शकतो, असे प्रतिपादन आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांनी येथे केले. आनंदजी कल्याणजी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट तसेच भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित अभय महामहोत्सवात आचार्यश्री भाविकांना मार्गदर्शन करीत होते. प्रवचनानंतर जोहरीवाडा येथील गोडीजी जैन मंदिर येथे गोडीजी पार्श्वनाथ भगवंतांच्या मूर्तीवर शांतीधारा अभिषेक करण्यात आला. सलग अडीच तास विविध औषधीयुक्त जलाचा अभिषेक करण्यात आला. शुक्रवारी १० रोजी आचार्य भगवंतांच्या आचार्यपदाच्या ३२ व्या प्रवेशानिमित्त आणि पंन्यास मोक्षरत्नजी यांच्या पंन्यासपदानिमित्त सकल जैन महिला मंडळातर्फे कुंभारवाडा येथे दुपारी २ वाजता मंगल गीत, भक्तिनाटिका, नृत्यनाटिका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरू राम जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवारी सकल जैन समाजाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे व खताचे वाटप करण्यात येणार आहे. पानदरिबा येथील अग्रसेन भवन येथे सकाळी ९ वाजता आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी यांच्या हस्ते शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बियाणे आणि खताचे वाटप करण्यात येणार आहे.यावेळी आचार्यश्रींचे ‘महावीर के पथ पर -मानवता के प्रकाश मे’ या विषयावर प्रवचन होणार आहे. त्यानंतर दुष्काळ निवारण तसेच भरपूर पर्जन्यवृष्टीकरिता जप अनुष्ठान करण्यात येणार आहे.