लोकमत महामॅरेथॉनच्या बिब एक्स्पो सोहळ्यात धावपटूंचा उत्साह शिगेला; आता वेध धावण्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:26 IST2024-12-14T13:25:42+5:302024-12-14T13:26:19+5:30

बिब एक्स्पो सोहळ्यादरम्यान लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना रनर किट दिले जाणार आहे.

Runners' enthusiasm peaks at the Bib Expo ceremony of Lokmat Mahamarathon; Now they are eager to run | लोकमत महामॅरेथॉनच्या बिब एक्स्पो सोहळ्यात धावपटूंचा उत्साह शिगेला; आता वेध धावण्याचे

लोकमत महामॅरेथॉनच्या बिब एक्स्पो सोहळ्यात धावपटूंचा उत्साह शिगेला; आता वेध धावण्याचे

छत्रपती संभाजीनगर : उद्या, रविवारी होणारी लोकमत महामॅरेथॉन संस्मरणीय करण्यासाठी व या उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व नागरिक, धावपटू आतूर झाले आहेत. या महामॅरेथॉननिमित्त शनिवारी (दि. १४) लोकमत समूहातर्फे बिब एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत भवन येथील हॉलमध्ये या एक्स्पो सोहळ्याचे आज सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. बिब एक्स्पो सोहळ्यादरम्यान लोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना रनर किट दिले जाणार आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान मॅरेथॉनमध्ये सहभागी असणारे सर्व नागरिक, धावपटूंनी बिब एक्स्पोला येताना शुल्क भरल्याची पावती दाखवून आपले रनर किट घेऊन जावे.

दरम्यान, बिग एक्स्पो सोहळ्यात आयर्नमॅन असणाऱ्या २० जणांचा दुपारी १२ वाजता सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर १२:३० वाजता फिटनेस प्रशिक्षक माधुरी पाटील या महामॅरेथॉनमध्ये दिशादर्शक असणाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी १:३० वाजता पोषक आहाराविषयी शलाका पाटील यांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी २:३० ते ४:३० यादरम्यान रॉक बॅण्डचा कार्यक्रम असणार आहे. दुपारी चार वाजता दिव्यांग रन असणार आहे.

धावणमार्गावर ढोल-ताशा, लेझीम
धावपटूंचा ऊर्जा मिळावी व त्यांचा उत्साह कायम राहावा, यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील १३ शाळांचे विद्यार्थी ढोल-ताशे, लेझीम पथके, नृत्यांसह सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विविध मार्गांवर सहभागी धावपटू, नागरिकांचा उत्साह वाढविणार आहेत. धावपटूंचा उत्साह वाढविणाऱ्या शाळांमध्ये कलावती चौहान हायस्कूल, रिव्हर डेल हायस्कूल, भगवती विद्या मंदिर, सेंट लॉरेन्स, अल हुदा, सेंट जोन्स, एस अकॅडमी, शिवा ट्रस्ट, मोईन उलूम हायस्कूल, न्यू रेडिएंट इंग्लिश हायस्कूल, देवगिरी ग्लोबल स्कूल, एन्डोब्रेन्स स्कूल, जैन इंटरनॅशनल या शाळांचा समावेश असणार आहे.

महामॅरेथॉनसाठी फूड पार्टनर म्हणून ‘लोकमत’सोबत जोडले गेल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. निरोगी आरोग्यासाठी धावणे हा सर्वोत्कृष्ट व्यायाम आहे. दररोज शरीराच्या हालचालींमुळे तंदुरुस्ती टिकवणे आवश्यक आहे. महामॅरेथॉनसारख्या व्यावसायिक धावण्याच्या व्यासपीठामुळे ऊर्जेची भर मिळते. ‘लोकमत’चा उपक्रम नेहमीच नागरिकांसाठी फायदेशीर ठरताे आणि अशा एका लोकोपयोगी उपक्रमाचा भाग होण्याचा शक्ती लाइफस्पेसेसला अभिमान आहे.
– राजेश भरुका, व्यवस्थापकीय संचालक, शक्ती लाइफस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड

मी एक क्रीडाप्रेमी आहे आणि माझा विश्वास आहे की, जीवनासाठी खेळ आवश्यक आहे. सध्या क्रीडा क्षेत्राला खूप महत्त्व दिले आहे आणि लोक फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहेत. लोकमत महामॅरेथॉन हे शहराला तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करणारे असेच एक व्यासपीठ आहे. या वर्षी लोकमतची टॅगलाइन ‘रणभूमी’ आहे आणि रॉकसॉल्ट रेस्टॉरंट व लॉन टीमला लोकमत महामॅरेथॉनच्या व्हीआयपी लॉन्ज फूड भागीदार होण्याचा खूप आनंद होत आहे.
– राजेश चव्हाण, रॉकसॉल्ट रेस्टॉरंट आणि लॉन

लिनिक्स फॅशन आणि लोकमत महामॅरेथॉन हे खेळाडूंकरिता एक उत्तम संयोजन आहे. आम्ही सतत लोकमत महामॅरेथॉनसोबत जोडलेले आहोत, कारण हे देशातील धावपटूंसाठी एक असे व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक उत्साही धावपटू आपल्या आरोग्यासाठी धावण्याचा आनंद घेतो. लिनिक्स फॅशन लोकमत महामॅरेथॉनसोबत जोडले गेले याचा आम्हाला अभिमान आहे. सर्व धावपटूंना मनपूर्वक शुभेच्छा देते.
– आतिश भारुका, भागीदार, लिनिक्स फॅशन.

Web Title: Runners' enthusiasm peaks at the Bib Expo ceremony of Lokmat Mahamarathon; Now they are eager to run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.