रन फॉर फ्रीडम! स्वातंत्र्यदिनानिमित्त असणार लोकमत महामॅरेथॉनमध्ये विशेष सवलत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 08:05 IST2025-08-15T07:59:40+5:302025-08-15T08:05:01+5:30
१५ ते १८ ऑगस्टपर्यंतच असणार ऑफर, ३, ५, १० व २१ कि. मी. साठी असणार सवलत

रन फॉर फ्रीडम! स्वातंत्र्यदिनानिमित्त असणार लोकमत महामॅरेथॉनमध्ये विशेष सवलत
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रभरातील नागरिक आणि धावपटूंसाठी जिव्हाळ्याचा विषय असणारी आणि लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनच्या नवव्या पर्वाची सुरुवात यंदा कोल्हापूर येथे १६ नोव्हेंबरपासून होत आहे. यंदाच्या सत्रातील महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या हजारो धावपटू, नागरिकांसाठी खूशखबर असून स्वातंत्र्यदिनानिमित्त शुल्कात विशेष सवलत ठेवण्यात आली आहे. ३, ५, १० आणि २१ कि. मी. अंतरात धावणाऱ्यांसाठी ही विशेष सवलत १५ ते १८ ऑगस्टदरम्यान असणार आहे.
सळसळते चैतन्य आणि सर्व जाती-धर्मांना एका छताखाली आणून सामाजिक सलोखा निर्माण करणाऱ्या आणि निरोगी आरोग्याचा संदेश देणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनमध्ये २१ कि. मी. अंतरासाठी १८०० आणि १० कि.मी. अंतरासाठी १५०० शुल्क असते. मात्र, १५ ते १८ ऑगस्टदरम्यान महामॅरेथॉनमधील आपला प्रवेश निश्चित केल्यास १० व २१ कि.मी. अंतरासाठी ६९९ रुपये तर ३ आणि ५ कि. मी. अंतरासाठी फक्त ४९९ रुपये शुल्क असणार आहे. धावपटूंसाठी ही सुवर्णसंधी असून पैशांचीही बचत होणार आहे.
कोल्हापूरपासून होणार महामॅरेथॉनची सुरूवात
महामॅरेथॉनचा श्रीगणेशा कोल्हापूर येथे १६ नोव्हेंबरपासून होत आहे. त्यानंतर महामुंबई ३० नोव्हेंबर, छत्रपती संभाजीनगर येथे १४ डिसेंबर, तसेच पुढील वर्षी नाशिक, नागपूर आणि पुणे येथे अनुक्रमे ४ जानेवारी, १ फेब्रुवारी आणि २२ फेब्रुवारी राेजी महामॅरेथॉनचा थरार रंगणार आहे.
७२ लाख रुपयांची पारितोषिके
यंदा होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी ७२ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
नोंदणी www.mahamarathon.com या वेबसाईटवर देखील करता येईल
अधिक माहितीसाठी ८९९९६११९५४ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.