उपचारासाठी धावले डॉक्टर
By Admin | Updated: May 26, 2014 00:58 IST2014-05-26T00:51:33+5:302014-05-26T00:58:29+5:30
परभणी : परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीजवळ लक्झरी बसचा पाटा तुटल्याने बस उलटून सुमारे ३० वºहाडी जखमी झाले़
उपचारासाठी धावले डॉक्टर
परभणी : परभणी- गंगाखेड रस्त्यावरील दैठणा गावाजवळील इंद्रायणी नदीजवळ लक्झरी बसचा पाटा तुटल्याने बस उलटून सुमारे ३० वºहाडी जखमी झाले़ या जखमींना एका वाहनामधून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले़ त्यावेळी डॉक्टर व परिचारिकांची एकच धावपळ उडाली़ काही मिनिटांमध्येच डॉक्टर व परिचारिकांचा ताफा मदतीसाठी धावून आल्याने रुग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळाला़ रविवार असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील बाह्य विभाग बंद असतो़ तसेच रुग्णांची संख्या तोकडी असते़ त्यातच दैठणा गावाजवळ वºहाडाला घेऊन जाणारी लक्झरी बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटल्याने ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले़ जखमींना उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दुपारी ४ वाजता एका वाहनामधून आणले़ एकाच वेळी एवढे जखमी आणल्याने अपघात विभागात असलेल्या डॉक्टर व परिचारकांची एकच तारांबळ उडाली़ या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिल्यानंतर काही मिनिटांमध्येच प्रभारी जिल्हा चिकित्सक प्रकाश डाके यांच्यासह डॉक्टर व परिचारिकांचा ताफा अपघात विभागात दाखल होऊन जखमींवर तत्काळ उपचार झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला़ तसेच प्रभाकर वाघीकर यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बोरी येथून थेट जिल्हा रुग्णालयात आले़ त्यांनी रुग्ण व नातेवाईकांना मदत केली़ तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रणय अशोक हेही आपल्या पोलिस फौजफाट्यासह दाखल झाले़ त्यामुळे गर्दीवर नियंत्रण करण्यात आल्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे सोयीचे झाले़ जखमींना पाहण्यासाठी नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती़ यामुळे रुग्णालय परिसराला गर्दीचे स्वरुप आले होते़ (प्रतिनिधी)वºहाडाच्या अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रकाश डाके यांना मिळाली़ त्यानंतर डॉ़ डाके यांनी स्वत: रुग्णालयात येऊन जखमींवर उपचार केले, तसेच डॉक्टर व परिचारिकांचा ताफा बोलावून घेतला़ एकाच वेळी ३० ते ३५ जखमी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आल्यामुळे डॉक्टर व परिचारिकांची एकच धांदल उडाली़घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काही मिनिटांमध्येच डॉक्टर उपलब्ध झाले व जखमींवर उपचार केले़ यावेळी डॉक्टर अमोल भालेराव, डॉ़ जफर, डॉ़ काळे, डॉ़ रणवीर, डॉ़ किरण नागोली, डॉ़ दिनकर पाटील यांच्यासह परिचारिका शीला कुलकर्णी, अलका आखाडे, रत्नपारखे, बावनकर, बोराडे, बोथीकर, सोनटक्के यांच्यासह कर्मचार्यांनीही परिश्रम घेतले़ प्रभाकर वाघीकर यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोरी येथून काही वेळामध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल झाले व वाघीकर यांनी रुग्णालयात नातेवाईकांची होणारी गर्दी आटोक्यात आणून रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत केली तसेच जखमी रुग्णांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकांची तत्काळ व्यवस्था केली़ त्यामुळे प्रभाकर वाघीकर यांच्या माणुसकीचे दर्शन पहावयास मिळाले़ त्यांच्या उपस्थितीमुळे रुग्ण व नातेवाईकांना मानसिक आधार मिळाला़ दैठणा गावाजवळ लग्नाचे वºहाड घेऊन जाणार्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती परभणी पोलिसांना समजल्यानंतर जिल्हा रुग्णालयात अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक हे दाखल झाले़ त्यांच्यासह पोलिस कर्मचारी आल्याने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे सोपे झाले़ रुग्णालयाच्या परिसरात पोलिस व जखमींच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती़ गंभीर जखमींना नांदेड येथे हलविण्यासाठी रुग्णालयाच्या वतीने तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या़ त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत होते़