शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

नियम, अटीशर्थी धाब्यावर; शहरात टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा ठेका शिवसेनेला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 12:30 IST

चक्क शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा ठेका देण्यात आला

ठळक मुद्देएकीकडे औरंगाबादकरांची तहान भागविण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे शिवसेनेकडून दाखविण्यात येत आहे. दुसरीकडे औरंगाबादकरांच्या हक्काचे पाणी टॅँकरद्वारे काळ्याबाजारात विकण्याचा उद्योगही फोफावला आहे.

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : महापालिकेत तीन दशकांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेने शहराचा पाणी प्रश्न साेडविला नाही. महापालिका ( Aurangabad Municipality ) निवडणुकीच्या तोंडावर १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे गाजर दाखविण्यात येत आहे. दुसरीकडे चक्क शिवसेनेच्या ( Shiv Sena ) पदाधिकाऱ्यास टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा ठेका देण्यात आला. हा ठेका देताना प्रशासनाने सर्व नियम अक्षरश: पायदळी तुडविले. एका बड्या नेत्याच्या इशाऱ्यावर हे सर्वकाही केल्याचे बोलले जात आहे. ( Shiv Sena gets water supply contract by tanker in the Aurangabad city ) 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजनांचे आयुष्य १५ वर्षांपूर्वीच संपले. जायकवाडीहून अतिरिक्त पाणी आणण्यासाठी २००५ मध्ये समांतरसाठी फक्त ४९० कोटी रुपये लागत होते. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी याला विरोध दर्शविला. नंतर पीपीपी मॉडेल तयार करून युटिलिटी ही खासगी कंपनी आणण्यात आली. या कंपनीने कोट्यवधी रुपये मनपाकडून वसूल केले. मुख्य जलवाहिनीचे कामच केले नाही. अखेर या कंपनीची हकालपट्टी झाली. आता १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. तीन वर्षांत ही योजना पूर्ण होईल, असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. परंतु आजपर्यंत मुख्य जलवाहिनीचे कामच सुरू झालेले नाही. एकीकडे औरंगाबादकरांची तहान भागविण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे शिवसेनेकडून दाखविण्यात येत आहे. दुसरीकडे औरंगाबादकरांच्या हक्काचे पाणी टॅँकरद्वारे काळ्याबाजारात विकण्याचा उद्योगही फोफावला आहे. औरंगाबाद मध्यचे शिवसेनेचे शहर प्रमुख दत्तात्र्यय (बाळासाहेब) रामराव थोरात यांच्या राम इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सीला महिनाभरापूर्वी मनपा प्रशासनाने टॅँकरचा ठेका दिला. हा ठेका देताना नियम, अटी, शर्थी खास राजकीय व्यक्तीसाठी शिथिल करण्यात आल्या.

ठेका घेण्यासाठी बोगस कागदपत्रेमहापालिकेतील टॅँकरचा ठेका मिळविण्यासाठी राम इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक दत्तात्र्यय थोरात यांनी बोगस कागदपत्रांचा आधार घेतला. या कागदपत्रांची शहानिशा करण्याचे धाडसही महापालिकेतील संबधित अधिकाऱ्यांनी दाखविले नाही. आश्चर्यजनक बाब म्हणजे निविदेतील अटीनुसार पाण्याचे टँकर दाखविण्यासाठी थोरात यांनी चक्क पेट्रोल-डिझेल आणि दुधाच्या टँकरचे कागदपत्रे जाेडले. महापालिकेने ते मान्यही केले.

असे तुडविले नियम पायदळी :- महापालिकेने यापूर्वी टँकरची निविदा जेव्हा जेव्हा प्रसिद्ध केली त्यात इच्छुक एजन्सीकडे किमान ३ वर्षांचा अनुभवाची अट होती. राम इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हा नियम एक वर्षांवर आणण्यात आला.- टॅँकरचा ठेका मिळविण्यासाठी इच्छुक एजन्सीने १२ टॅँकरचे आरसीटीसी, इंश्युरन्स, फिटनेस कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सादर करणे बंधनकारक होते. महापालिकेने कागदपत्र कोणते घेतले हे सुद्धा तपासलेले दिसत नाहीत.- शहरात पाणीपुरवठ्यासाठी किमान ८० टँकर लागतात. या टँकरची मालकी, कागदपत्रे तपासण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना होते. परंतु एकाही टँकरची मालकी, लायसन्स, फिटनेस तपासले नाही.- सर्व टॅँकरचे आरटीओ फिटनेस, विमा, परवाना, चालकाचे लायसन्स वाहनासोबत ठेवणे बंधनकारक केले. मात्र, एकाही टँकरची असे कोणतेही कागदपत्रे नाहीत.- टँकरबाबत आरटीओ कार्यालयाने दिलेली प्रमाणपत्रे, त्याची तपासणी आदी बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील, या अटीमुळे मनपाचे अधिकारी कोणती तपासणी करणार आहेत? यावरच प्रश्न उपस्थित होतो.- टँकरचा ठेका मिळविण्यासाठी इच्छुक एजन्सीने विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांना ५० टॅँकरने पाणीपुरवठा केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे अशी पूर्वी अट होती. ही अट आता ३३ टॅँकरवर आणण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीShiv Senaशिवसेना