शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओत दलाल आतमध्ये तर वाहनधारक बाहेर

By admin | Updated: January 23, 2015 00:57 IST

औरंगाबाद : आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुरुवारी काहीशी जाग आल्याचे चित्र दिसून आले.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालय दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुरुवारी काहीशी जाग आल्याचे चित्र दिसून आले. कार्यालयाचे एक गेट सकाळपासून बंद ठेवण्यात आले, तर दुपारनंतर दुसऱ्या गेटवर मोटार वाहन निरीक्षक आणि एका लिपिकास तैनात करण्यात आले. आतमध्ये येणाऱ्यांकडील कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना आत सोडण्यात येत होते; परंतु आतमध्ये असलेल्या दलाल मंडळींबाबत कोणतीही खबरदारी न घेतल्याने आतमध्ये दलाल आणि वाहनधारक बाहेर, असेच काहीसे चित्र दिसून आले.आरटीओ कार्यालयातील दरवाजा बंद ठेवण्यात येत असल्याने दलालांना आतमध्ये येता येत नसल्याचे आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगितले जात होते; परंतु कार्यालयाच्या परिसरात खुर्च्या टाकून रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये बसून काम करणाऱ्या दलालांकडे कानाडोळा केला जात होता. यांना कोण हटविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. गुरुवारी सकाळपासून कार्यालयाचे एक गेट बंद ठेवण्यात आल्याने दलालांवर कारवाई होणार असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. त्यामुळे अनेक दलालांनी कार्यालयात येण्याचे टाळल्याचे दिसून आले. दुपारनंतर दुसऱ्या दरवाजावर वाहन निरीक्षक आणि लिपिकाकडून येणाऱ्यांकडील कागदपत्रांची तपासणी सुरू करण्यात आली. यामुळे गेटवर वाहनधारकांची मोठी गर्दी झाली होती. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे कार्यालय परिसरात अनेक दलाल मंडळी आपली कामे सुरळीतपणे करीत असल्याचे दिसून आले. तसेच वाहनांच्या टॅक्सचे शुल्क भरण्यासाठी वाहनमालकांना आणण्याची सूचनाही अनेकांना करण्यात आली, तर गेटवर काही प्रमाणात दलाल मंडळींना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचे दिसून आले. ४दुपारपर्यंत अनेक दलाल मंडळी आपली कामे पूर्ण करण्यावर भर देतात. त्यामुळे दुपारनंतरच्या तपासणीचा त्यांच्या कामावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले. गेटवर दररोज रोटेशननुसार मोटार वाहन निरीक्षक आणि लिपिकास तैनात क रण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियमित कामाबरोबर अशा प्रकारे अतिरिक्त काम करण्याची वेळ येणार आहे.