गुडघ्यावर उपचार करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचे ७० हजार रुपये पळविले

By | Updated: December 4, 2020 04:12 IST2020-12-04T04:12:58+5:302020-12-04T04:12:58+5:30

पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद खान आमिर खान (रा. वाकडी, ता. भोकरदन, जि. जालना) हे गुडघ्यावरील उपचार आणि मुलाला भेटण्यासाठी ...

Rs 70,000 was stolen from a farmer who came for treatment on his knee | गुडघ्यावर उपचार करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचे ७० हजार रुपये पळविले

गुडघ्यावर उपचार करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचे ७० हजार रुपये पळविले

पोलिसांनी सांगितले की, मोहम्मद खान आमिर खान (रा. वाकडी, ता. भोकरदन, जि. जालना) हे गुडघ्यावरील उपचार आणि मुलाला भेटण्यासाठी बुधवारी एसटी बसने औरंगाबाद आले. हडको कॉर्नर येथून ते रिक्षामध्ये बसले. त्यांच्या शेजारी तीन जण रिक्षात घेऊन बसले. त्यांनी मोहम्मद यांना मागे पुढे सरका, असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. या हालचालीत त्यांनी मोहम्मद यांच्या बनियनचा खिसा कापून त्यातील ७० हजार रुपये पळवले. सिद्धार्थ चौकात रिक्षा थांबविण्यास सांगून ते आरोपी रिक्षातून उतरून गेले. त्याच वेळी रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी चालकास रिक्षा थांबविण्यास सांगितले, तोपर्यंत रिक्षा टीव्ही सेंटर चौकात आली होती. त्यांनी रिक्षाचालकाला परत सिद्धार्थ चौकाकडे रिक्षा घेण्यास सांगितले. मात्र, आरोपी तेथे नव्हते. त्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार नरसिंग पवार हे तपास करीत आहेत.

Web Title: Rs 70,000 was stolen from a farmer who came for treatment on his knee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.