शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बुडतेय कोट्यवधींची रॉयल्टी

By admin | Updated: July 20, 2014 00:33 IST

चेतन धनुरे , लातूर ‘पळत्याच्या पाठी ब्रम्हराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे महसूल विभागाची अवस्था झाली आहे़

चेतन धनुरे , लातूर‘पळत्याच्या पाठी ब्रम्हराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे महसूल विभागाची अवस्था झाली आहे़ एकिकडे परवाना नसतानाही भराभर उपसा करुन रॉयल्टी बुडवीत बिनबोभाट गौण खनिजाची विक्री सुरु आहे़ दुसरीकडे परवाने घेऊन अतिरिक्त उपसा केलेल्या खाण पट्टेधारकांना लाखों रुपयांच्या रॉयल्टीच्या नोटिसा धाडल्या गेल्या आहेत़ नियमानुसार परवानाधारकांकडून ही वसुली होणे आवश्यकच आहे़ परंतु, विनापरवाना उपसा करणाऱ्यांना वाहन सापडल्यास केवळ किरकोळ दंड आकारुन सोडण्यात येत आहे़लातूर जिल्ह्यात अवैध गौण खनिजाचा अक्षरश: बाजार मांडला गेला आहे़ महसूल विभागानेच शोधून काढलेल्या अवैध खाणींतून कोट्यवधींचे गौण खनिज चोरी झाल्याचे समोर आले़ शिवाय, परवाना असलेल्या अनेक खाणपट्ट्यातूनही भरलेल्या रॉयल्टीपेक्षा अधिक गौण खनिजाचा उपसा झाला आहे़ त्यामुळे परवानाधारकाकडून त्यांनी उपसलेल्या अतिरिक्त गौण खनिजाची रॉयल्टी वसूल करण्याची कार्यवाही सध्या तहसील स्तरावरुन सुरु झाली आहे़ एकिकडे ही कारवाई सुरु असतानाच अवैध खाणपट्ट्यातील उपसा मात्र अजूनही थांबलेला नाही़लातूर तालुक्यात प्रशासनास केवळ दोन अवैध खाणपट्टे आढळून आले आहेत़ परंतु, प्रत्यक्षात त्यांची संख्या याहून कैकपटीने अधिक आहे़ आखरवाई, चिखुर्डा, अंकोली, मुरुड अकोला, गातेगाव भागात अवैध खाणपट्टे सुरुचआहेत़ येथून उपसा केले जाणारे गौण खनिज लातूर शहरात विक्री केले जाते़ सरासरी ३ ब्रास क्षमता असणाऱ्या जवळपास ३० ते ४० वाहनांतून या गौण खनिजाची वाहतूक केली जात आहे़ एका वाहनाच्या दररोज सरासरी ५ ट्रीपा होत असल्याची माहिती विक्रीच्या पॉर्इंटवरील एका वाहनचालकाकडे सहज चौकशी केली असता मिळाली़ म्हणजेच सरासरी ५०० ब्रास गौण खनिजाची वाहतूक सध्या सुरु आहे़ ज्याची रॉयल्टी १ लाख रुपये होते़ वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी किमान २०० ते २५० दिवस जरी वाहतूक झाली तरी २ ते २़५ कोटी रुपयांची रॉयल्टी मिळू शकते़ परंतु, प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ वाहन पकडले गेल्यास महसूल विभागाकडून ५२०० किंवा ७४०० रुपये दंडाची पावती फाडली जाते़ इतक्या किरकोळ कारवाईवरच महसूल विभागाची ‘तहान’ भागते (?)़ वास्तवात चोरुन आणलेल्या वाहनधारकाकडे कसून चौकशी करीत त्याने गौण खनिज कोठून आणले, याचा शोध घेतल्यास विनापरवाना खाणपट्ट्यांची ‘खाण’ महसूलला सापडू शकते़ परंतु, त्याकडे दुर्लक्ष करुन केवळ दंडावरच भागविले जात आहे़ ज्यामुळे कोट्यवधींची रॉयल्टी बुडत आहे़ईटीएस मोजणीतही लपवाछपवी़़़जिल्हाधिकारी डॉ़विपीन शर्मा यांनी पुढाकार घेऊन ईटीएस प्रणालीद्वारे जिल्ह्यातील गौण खनिजाचा अचूक उपसा मोजण्याचा उपक्रम हाती घेतला़ पहिल्या टप्प्यातील मोजणीतच बरेच पितळ उघडे पडले़ सध्या दुसऱ्या टप्प्यातील मोजणी सुरु आहे़ मात्र आता काही परवानाधारक मोठ्या खाणी लपवून खाणीच्या जागेची पुरेसी माहिती नसलेल्या बाहेरील पथकाला छोट्या खाणी दाखवीत त्यांचे मोजमाप करुन घेत आहेत़जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासानजीकच विक्री़़़जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाच नंबर चौक परिसरात अवैैध गौण खनिजाची विक्री केली जाते़ याठिकाणी दिवसभर अनेक वाहने थांबून असतात़ तरीही महसूल विभागाचे याकडे लक्ष नसल्याचेच दिसून येत आहे़