आठ लाख लिटरने घटला रॉकेल कोटा

By Admin | Updated: February 3, 2015 00:59 IST2015-02-03T00:20:46+5:302015-02-03T00:59:21+5:30

बीड : जिल्ह्यातील २ हजार १०० च्या जवळपास असलेल्या स्वत धान्य दुकानांवर कमी भावात मिळणाऱ्या रॉकेलचा कोटा महिन्याकाठी ७२ हजार लिटरने कोटा कमी केला.

Rooted kerosene decreased by eight lakh liters | आठ लाख लिटरने घटला रॉकेल कोटा

आठ लाख लिटरने घटला रॉकेल कोटा



बीड : जिल्ह्यातील २ हजार १०० च्या जवळपास असलेल्या स्वत धान्य दुकानांवर कमी भावात मिळणाऱ्या रॉकेलचा कोटा महिन्याकाठी ७२ हजार लिटरने कोटा कमी केला. यामुळे वर्षाला ८ लाख ६४ हजार लिटर कमी येणार आहे. यामुळे नागरिकांना मिळत असलेले रॉकेल अत्यल्प असल्याने शासनाच्या या निर्णयावर गोरगरीब नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्याचा रॉकेलचा कोटा घटल्यामुळे नागरिकांना रॉकेलची कमतरता जाणवू लागली आहे. वर्षाकाठी ८ लाख ६४ हजार लिटरने रॉकेलचा कोटा घसरला असल्याचे पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार रॉकेलसह धान्याचा कोटा देखील कपात करण्यात आला आहे. ग्रामीण भागात सतत भारनियमन असते यामुळे रॉकेल मोठ्या प्रमाणात लागते. पूर्वी प्रत्येक कुटुंबाला पाच लिटर प्रमाणे रॉकेल स्वस्त धान्य दुकानावर मिळत होते. शासनाने कोटा कमी केल्यानंतर आता केवळ दोन लिटर रॉकेल दिले जात आहे. सर्व सामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
पूर्वी जिल्ह्यासाठी १ लाख ९० हजार ८०० लिटर रॉकेल पुरवठा केला जात होता. शासनाच्या निर्णयानंतर मात्र १ लाख १८ हजार ८०० लिटर रॉकेल बीड जिल्ह्यासाठी येत आहे. एकीकडे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त धान्य तसेच रॉकेल कमी भावात मिळणे अपेक्षीत आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाने एकूण जिल्ह्याचा रॉकेल व धान्याचा कोटा कमी केला आहे. पूर्वी एका कुटुंंबाला पाच लिटर रॉकेल मिळत होते. आता मात्र केवळ दोन लिटर रॉकेल दिले जात असल्याने जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
रॉकेलबरोबरच धान्याचाही ४० टक्के कोटा कपात केला आहे. पूर्वी एका कार्डवर ३५ किलो स्वस्त धान्य मिळायचे. मात्र, आता माणसी पाच किलो धान्य वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
४यामुळे छोटे कुटुंब असलेल्यांना ३५ किलो धान्याऐवजी १० ते १५ किलोवरच समाधान मानावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक नाराज आहेत.

Web Title: Rooted kerosene decreased by eight lakh liters