भाविकांची लूट करणारे दोघे जेरबंद

By Admin | Updated: May 12, 2014 00:08 IST2014-05-11T23:24:36+5:302014-05-12T00:08:05+5:30

तुळजापूर: गोमुख तीर्थावर अांघोळीस गेलेल्या भाविकाच्या आई-वडिलांजवळील कपड्यातील पॉकेट लंपास केल्याप्रकरणी दोघाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

The robbers have robbed the robbers | भाविकांची लूट करणारे दोघे जेरबंद

भाविकांची लूट करणारे दोघे जेरबंद

तुळजापूर: गोमुख तीर्थावर अांघोळीस गेलेल्या भाविकाच्या आई-वडिलांजवळील कपड्यातील पॉकेट लंपास केल्याप्रकरणी दोघाविरूध्द तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास तुळजा भवानी मंदिरात घडली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़ पोलिसांनी सांगितले की, अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील तुळजाराम चंद्राम्मा कट्टीमनी हे रविवारी पहाटेच्या सुमारास आपल्या आई-वडिलांना घेऊन श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते़ मंदिरात आल्यानंतर ते गोमुख तीर्थात अांघोळीसाठी गेले़ तत्पूर्वी त्यांनी आपले कपडे आई-वडिलांकडे दिले होते़ त्यावेळी तेथे आलेल्या दोघांनी कपड्यातील पॉकेट लंपास केले़ ही घटना लक्षात येताच कट्टीमनी यांनी तुळजापूर पोलिसात तक्रार दिली होती़ या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज पाहून अरूण अंकुश बडगुजर, लखन कन्हैय्यालाल गौड (वय-३६ रा़माळीनगर अकलूज) या दोघांना अटक केली़ या प्रकरणी तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास फौजदार बुवा हे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: The robbers have robbed the robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.