शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता चोरीला जातो तेंव्हा़़़

By admin | Updated: November 23, 2014 00:26 IST

सोमनाथ खताळ, बीड रस्त्यावर बांधकामे करून रस्ते ढापण्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे़ कागदावर १०० फूट असलेला रस्ता आता केवळ १० फूट राहिला आहे़

सोमनाथ खताळ, बीड रस्त्यावर बांधकामे करून रस्ते ढापण्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे़ कागदावर १०० फूट असलेला रस्ता आता केवळ १० फूट राहिला आहे़ त्यामुळे रस्ता चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे़ अप्पर सचिवांनी या प्रकरणाची दखल घेऊन पालिकेला आदेश दिले़ मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली़ त्यामुळे अधिकारी व अतिक्रमणधारकांचे साटेलोटे उघड झाले आहे़ शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलेले आहेत़ हे बांधकाम करताना पालिकेकडून परवाना घेतला जातो़ मात्र हा परवाना जागेची पाहणी न करताच पालिकेकडून दिला जात आहे. त्यामुळे बेकायदेशीर बांधकाम करून जागा ढापण्याचे काम केले जात आहे. बेकायदेशीर बांधकाम करणारांचे हात बळकट करण्याचे काम नगर रचना विभागातील अधिकारीच करीत असल्याचा अरोप सामाजिक कार्यकर्ते ललीत अब्बड यांनी केला आहे. शहरातील जालना रोडहून तरफमाळी भागातून कृष्ण मंदिराकडे रस्ता जातो. या रस्त्यावर सध्या पालिकेकडूनच पाच ते दहा फूट खोल नाल्या खोदल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता अरूंद झाला आहे. पालिकेने केला होता प्रस्ताव रस्ता ३० मिटरऐवजी ९ मिटर करावा, असा प्रस्ताव दाखल केला होता. मात्र हा प्रस्ताव नस्तिबद्ध करण्यात आला होता. हा रस्ता मोठा होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या रस्त्याचे तीनतेरा झाले चौकशी करून कारवाई या रस्त्याची मी स्वत: चौकशी करतो. हा मुद्दा लक्षात घेऊन मी चौकशी करतो, आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसींग यांनी सांगितले.